चित्रपट,मालिकेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आठवड्याला होणार कोरोना चाचणी

चित्रपट,मालिकेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आठवड्याला होणार कोरोना चाचणी

चित्रपट, मालिकेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आठवड्याला होणार कोरोना चाचणी

कोरोनाचा वाढता प्रसार पाहत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’ मोहिम राबवली आहे. अत्यावशक सेवा वगळता शनिवार रविवार कडक संचारबंदी तसेच इतर दिवस जमावबंदी करण्यातआली असून अनेक कडक निर्बंध लागूकरण्यात आले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर ‘भारतीय चित्रपट आणि मालिका निर्माता संघटनेतर्फे’ (Indian film and television producer council) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. टीव्ही वर सध्या सुरू असणार्‍या मालिके मध्ये काम करणार्‍या कलाकारांची तसेच इतर कर्मचार्‍यांची दर १५ दिवसांनी RT-PCR चाचणी तसेच आठवड्याला अँटिजेन चचणी करण्यात येणार आहे.

कोरोना चाचणी

सध्या संपूर्ण भारतामध्ये ९० पेक्षा जास्त मालिका प्रसारीत करण्यात येत आहेत. या मालिकेमध्ये  ९० हजार पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. या सर्वांची RT-PCR तसेच अँटिजेन चचणी करून त्याचा अहवाल ‘भारतीय चित्रपट आणि मालिका निर्माता संघटने’ कडे पाठवण्यात येणार आहे. अहवालात कोरोना व्हायरस सबंधित काही लक्षणे आढळून आल्यास पुढील निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. कोरोना व्हायरसमुळे चित्रपट सृष्टीला उतरती कळा लागली आहे. तसेच अनेकांना नोकर्‍या देखील गमवाव्या लागल्या,आर्थिक नुकसान सहन करावे लागले. चित्रीकरण व्यवस्थित रित्या सुरू राहावे त्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून ‘भारतीय चित्रपट आणि मालिका निर्माता संघटने’ तर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत करण्यात आले आहे. सिनेसृष्टीशी निगडीत असलेले खासदार अभिनेते अमोल कोल्हे आणि आदेश बांदेकर यांचेही संघटनेने विशेष आभार मानले आहेत.


हे हि वाचा – इरफान खानच्या लेकाचे सिनेसृष्टीत पदार्पण

First Published on: April 11, 2021 2:15 PM
Exit mobile version