‘दि डर्टी पिक्चर’ चित्रपटाने माझं आयुष्य बदललं – विद्या बालन

‘दि डर्टी पिक्चर’ चित्रपटाने माझं आयुष्य बदललं – विद्या बालन

विद्या बालन

बॉलीवूडमधील वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री विद्या बालन हिने तिच्या एका खास चित्रपटाची आठवण प्रेक्षकांसमोर मांडली आहे. नुकतेच तिच्या ‘दि डर्टी पिक्चर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला ७ वर्ष पूर्ण झाली असून तिने हा सिनेमा म्हणजे माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटानंतर माझं आयुष्यच बदलून गेलं, असं तिने म्हटलं आहे. याबाबतच्या आठवणी तिने सोशल मीडियावर शेअर करताना त्या सिनेमाची छोटी झलक असणारा व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

सात वर्षांपूर्वी झालेला प्रदर्शीत

मिलन लुथरिया यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर यांच्या बालाजी फिल्म्सने केली होती. या चित्रपटात विद्याने तिचा साधा सोज्वळ अवतार बदलून बोल्ड रुपात प्रेक्षकांच्या समोर आणला होता. दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री सिल्क स्मिता हिच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट बनवण्यात आला होता. त्या विद्याने सिल्कची व्यक्तीरेखा साकारली होती. ‘दि डर्टी पिक्चर’ हा डिसेंबर २०११ साली पदर्शीत झाला होता, त्याची आठवण काढताना अभिनेत्री विद्या बालने या चित्रपटाचे तिच्या आयुष्यातील महत्त्व सांगितले आहे.

First Published on: December 3, 2018 10:16 PM
Exit mobile version