‘द फॅमिली मॅन’ फेम प्रियमणि आणि मुस्तफाचे लग्न आहे अवैध,पुर्व पत्नीने केला दावा

‘द फॅमिली मॅन’ फेम प्रियमणि आणि मुस्तफाचे लग्न आहे अवैध,पुर्व पत्नीने केला दावा

'द फॅमिली मॅन' फेम प्रियमणि आणि मुस्तफाचे लग्न आहे अवैद्य,पुर्व पत्नीने केला दावा

‘द फॅमिली मॅन’ या प्रसिद्ध वेब सिरीजमध्ये झळकलेली दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियमणि हिने आपल्या अभिनय कौशल्याने सर्व रसिकांचे मन जिंकले आहे. ‘द फॅमिली मॅन’ मधील सुचि या पात्राची भूमिका प्रियमणिने चोख बजावली आहे. या वेब सिरीज नंतर प्रियमणीच्या चाहत्यांमध्ये आणखी भर पडली असे म्हणायला हरकत नाही. नुकतच प्रियमणिच्या वयक्तीगत आयुष्यातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे. प्रियमणिच्या लग्नवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. 2017 साली प्रियमणिने मुस्तफा राज याच्याशी विवाह गाठ बांधली होती. तसेच मुस्तफाच्या पहिल्या पत्नीने मुस्तफा आणि प्रियमणिचा विवाह अवैध असल्याचा दावा करत कोर्टात केस दाखल केली आहे.

काय आहे संपुर्ण प्रकरण-

मुस्तफाच्या पहिल्या बायकोचे नाव आयशा असून तिने कोर्टात धाव घेत प्रियमणि आणि मुस्तफा विरोधात घटला दाखल केला आहे. आयशाच्या म्हणण्यानूसार अजुनही मुस्तफा आणि तिचा घटस्फोट न झाल्याने प्रियमणि आणि मुस्तफाचा विवाह अधिकृतरित्या गैर असल्याचे तिने स्पष्ट केलं आहे. मुस्तफा आणि आयशा यांना दोन मुलं असून घरगुती हिंसाचार होत असल्याने आयशाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. पण अद्याप घटस्फोट झाला नसल्याचे तिने सागितले आहे.

मुस्तफाने आयशाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आयशा फक्त माझ्या कडून पैसे उकळण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप लावत आहे. मी नेहमी वेळेवर आयशाला मुलांच्या देखरेखीसाठी खर्च देतो. तसेच 2013 सालीच आम्ही विभक्त झालो आहोत


हे हि वाचा – हंसल मेहता दिग्दर्शित ‘कॅप्टन इंडिया’ सिनेमात कार्तिकची वर्णी,दिसणार पायलटच्या भूमिकेत

First Published on: July 23, 2021 2:43 PM
Exit mobile version