करोना व्हायरसमुळे ‘IIFA’च्या अवॉड सोहळ्याच्या तारखेत बदल

करोना व्हायरसमुळे ‘IIFA’च्या अवॉड सोहळ्याच्या तारखेत बदल

करोना व्हायरस सध्या अनेक देशातून धुमाकूळ घालत असल्याचे दिसत असून, भारतात देखील करोना व्हायरसने शिरकाव केल्याचे दिसत आहे. यामुळे अनेक महत्वपूर्ण निर्णय देखील पढे ढकलण्यात आले आहेत. यातच आता करोनाचा परिणाम सिनेसृष्टीत देखील झालेला दिसतो आहे. जागतिक पातळीवर चालणारा इंटरनॅशनल इंडियन फिल्म एकॅडमी (iifa) अवॉड सोहळा देखील पुढे ढकलण्यात आला आहे. यानंतर सोहळ्याची पुढची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा सोहळा मध्य प्रदेशातील इंदोर येथे आयोजित करण्यात आला होता.

नेमके कारण काय?

जागतिक पातळीवर होणारा iifa अवॉड सोहळ्याला जगभरातून लोक येत असतात. करोना व्हायरसचा मुद्दा लक्षात घेऊन मध्य प्रदेशातील सरकारने सुरक्षेचा मद्दा लक्षात घेऊन हा अवॉड सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा सोहळा २०२० च्या शेवटापर्यंत पुढे ढकलण्यात असून, या सोहळ्याची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. iifa हा जागतिक पातळीवर चालणारा सोहळा असल्याने यासाठी जगभरातून हा सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक येत असतात. अशा वेळी आरोग्याचा विचार करून हा सोहळा सध्या या वर्षाच्या शेवटापर्यंत पुढे ढकलण्यात आला असल्याचे समजते आहे.

 

First Published on: March 6, 2020 4:52 PM
Exit mobile version