आता OTT प्लॅटफॉर्मवर झळकणार ‘The Kashmir Files’

आता OTT प्लॅटफॉर्मवर झळकणार ‘The Kashmir Files’

बॉलिवूडचा लोकप्रिय नायक अनुपम खेर त्यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून या चित्रपटात 1990 मधील कश्मिरी पंडितांचा संघर्ष दाखवलेला आहे. 11 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं कोणतही प्रमोशन झालं नसलं तरीसुद्धा प्रेक्षक हा चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे पाहण्यासाठी चित्रपटगृह हाऊसफुल होत आहेत. त्यामुळे ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. प्रेक्षकांची हीच इच्छा आता Zee5ने पूर्ण करणार आहे.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाने चित्रपटगृहात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता लवकरचं Zee5 या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. परंतु अद्याप हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची घोषणा झालेली नाही.

या चित्रपटामध्ये 1990 च्या काळातील काश्मिरी पंडितांचा संघर्ष दाखवला असून 30 वर्षांपासून लपून असलेल्या काश्मिरी पंडितांची गोष्ट या चित्रपटाद्वारे जगासमोर मांडली आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात कश्मिरी पंडितांचे दुःख आणि संघर्षाची गोष्ट दाखवली आहे. या बरोबरच हा चित्रपट लोकतंत्र, धर्म, राजनीति आणि मानवतेवर आधारित आहे.

या चित्रपटात रवी खन्ना यांचे आक्षेपार्ह चित्रण केल्याचे सांगण्यात आले. स्क्वॉड्रन लिडर रवि खन्ना हे 25 जानेवारी 1990 मध्ये श्रीनगर येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झाले होते. या घटनेमध्ये वायुसेनेचे चार अधिकारी शहीद झाले होते. हा हल्ला जम्मू काश्मीर येथील लिब्रेशन फ्रंटचे प्रमुख यासीन मलिक यांनी केला होता.

‘द कश्मीर फाईल्स’ चे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले असून या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर हे कलाकर मुख्य भूमिकांमध्ये आहे.


हेही वाचा : The Kashmir Files : गोव्यासह ‘या’ राज्यांमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री


 

First Published on: March 15, 2022 2:38 PM
Exit mobile version