‘फतवा’ चित्रपटाचा म्युझिक लॉंच सोहळा संपन्न

‘फतवा’ चित्रपटाचा म्युझिक लॉंच सोहळा संपन्न

वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी चित्रपट सध्या लक्षवेधी ठरत आहेत. गोष्टी नामंजूर असल्या की त्याविरोधात फतवा काढून निषेध नोंदवला जातो. फतव्याच्या वेगवेगळया बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो. पण आता ‘फतवा’ हे शीर्षक असणारा मराठी चित्रपट रुपेरी पडद्यावर येत आहे. या चित्रपटाचा दिमाखदार म्युझिक अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. चित्रपटाचा टीझरही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. (The music launch ceremony of the movie ‘Fatwa’)

ब्ल्यु लाईन फिल्मस् प्रस्तुत आणि प्रतिक गौतम दिग्दर्शित ‘फतवा’ चित्रपट 9 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगत ही नवी जोडी ‘फतवा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या दोघांसोबत छाया कदम, मिलिंद शिंदे, नागेश भोसले, संजय खापरे,अमोल चौधरी, निलेश वैरागर, पूनम कांबळे, निखिल निकाळजे, निकिता संजय या कलाकारांची फळी ‘फतवा’मध्ये दिसणार आहेत. डॉ.यशवंत, प्रेमा निकाळजे, अनुराधा पवार यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे.

हे ही वाचा – जिंकणे किंवा हरणे हा प्रत्येक खेळाचा भाग… टीम इंडियाच्या पराभवानंतर अजय देवगणची पोस्ट चर्चेत

प्रेम हा प्रत्येकाच्या मनाचा हळवा कोपरा असतो. कुणी त्यात आकंठ बुडालेला असतो, तर कुणी त्याची चाहूल लागल्याने मोहरलेला असतो. कुणाला त्याचे चटकेही बसलेले असतात. ‘फ़तवा’ चित्रपटातून प्रेमाचा वेगळा पैलू उलगडणार असून हा चित्रपट प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने यावेळी व्यक्त केला.

विविध ढंगातील सहा गाणी या चित्रपटात आहेत. ‘अलगद मन’, ‘प्रेमाचा गोंधळ’ ही दोन गाणी चित्रपटात असून ‘अलगद मन’ हे मनस्पर्शी गीत गायिका पल्लक मुच्चल यांनी गायले आहे. तर ‘प्रेमाचा गोंधळ’ हे रांगडे गाणे गायक नंदेश उमप यांच्या पहाडी आणि दमदार आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. गीतकार डॉ.विनायक पवार यांच्या लेखनीतून उतरलेलं ‘चोरून चोरून’, ‘सजनी दोघं एक होऊ’ या प्रेमगीतांना अभय जोधपूरकर वेदा नेरुरकर यांचे मधुर स्वर असून संजीव–दर्शन यांनी या गीतांना संगीत दिले आहे. गीतकार अमोल देशमुख यांनी गीतबद्ध केलेलं ‘पुन्हा पुन्हा’ या भावप्रधान गाण्याला पद्मश्री सोनू निगम यांनी आवाज दिला आहे. प्रतीक गौतम,प्रवीण पगारे,सिद्धार्थ पवार यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे. आराफत मेहमूद यांनी गीत-संगीतबद्ध केलेलं ‘अली मौला’ ही कव्वाली साबरी ब्रदर्स यांनी गायली आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे.

हे ही वाचा – आयुष्मानच्या ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’मध्ये अक्षय कुमार आणि मलायका अरोराची होणार एन्ट्री

First Published on: November 11, 2022 3:31 PM
Exit mobile version