‘ढिशक्यांव’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न

‘ढिशक्यांव’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न

सध्या मराठी चित्रपटसृष्टीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यात भर घालण्यास सध्या ढिशक्यांव चित्रपटही सज्ज झाला आहे. ‘ढिशक्यांव’ चित्रपटाच्या बातम्यांनीही सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. चित्रपटाच्या पोस्टरने, गाण्यांनी तर प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली आहे अशातच नुकताच ढिशक्यांव चित्रपटाचा भव्य संगीत अनावरण सोहळा दिमाखात पार पडला. प्रथमेश परब, सुरेश विश्वकर्मा, अहेमद देशमुख, मेघा शिंदे या कलाकारांच्या तसेच दिग्दर्शक प्रितम एस के पाटील यांच्या परफॉर्मन्सने या सोहळ्याची शोभा द्विगुणित केली. निर्माते महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एस के पाटील निर्मित तर ‘फिल्मस्त्र स्टुडिओ’ आणि ‘झटपट फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘ढिशक्यांव’ हा चित्रपट १० फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

‘ढिशक्यांव’ चित्रपटाच्या नुकत्याच झालेल्या संगीत अनावरण सोहळ्यामध्ये चित्रपटातील सर्वच गाण्यांनी चारचाँद लावले. ‘दादा दमान घ्या’, ‘पोरी रे पोली’, ‘गेम केली पलटी’ असे बोल असणाऱ्या या गाण्यात प्रथमेश आणि लातूरच्या अहेमद देशमुखने चांगलाच कल्ला केला आहे. तर चित्रपटातील गाण्यांना संदेश पवार, प्रितम एस के पाटील, संकी स्वरभ यांनी शब्दबद्ध केले असून संगीतकार म्हणून सन्मित वाघमारे, श्रेयस देशपांडे यांनी बाजू सांभाळली आहे. तर चित्रपटातील गाणी गायक रोहित राऊत, सन्मित वाघमारे, तेजस जगदाळे यांनी त्यांच्या दमदार आणि सुमधुर आवाजात स्वरबद्ध करून चार चाँद लावले आहेत. दिग्दर्शक प्रितम एस के पाटील दिग्दर्शित ‘ढिशक्यांव’ हा चित्रपट असून निर्माते महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एस के पाटील यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे.

‘ढिशक्यांव’ चित्रपटाच्या गाण्यांनी अल्पावधीतच साऱ्या मायबाप प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलाय कारण ही गाणी लाँच होताच सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. तर येत्या १० फेब्रुवारीला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.


हेही वाचा :

महिला मॉडेलच्या व्हिडीओप्रकरणी अभिनेत्री राखी सावंतला अटक

First Published on: January 19, 2023 1:45 PM
Exit mobile version