घरमनोरंजनमहिला मॉडेलच्या व्हिडीओप्रकरणी अभिनेत्री राखी सावंतला अटक

महिला मॉडेलच्या व्हिडीओप्रकरणी अभिनेत्री राखी सावंतला अटक

Subscribe

राखी सावंतला मुंबई पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर आली आहे. राखीला एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. काही वेळानंतर राखीला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

काय आहे नेमक प्रकरण?

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी राखी सावंतने एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केले होते. या प्रकरणी त्या महिला मॉडेलने आंबोली पोलीस ठाण्यात राखीविरोधात गुन्हा दाखल केला होता. या मॉडेलच्या तक्रारीवरुन नोव्हेंबर 2022 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्या अंत्रर्गत राखीवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांकडून अनेकदा तिला समन्स देण्यात आला होता. परंतु राखी एकदाही पोलिस ठाण्यात उपस्थित राहिली नाही त्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली आहे. शिवाय याप्रकरणी पोलीस आता तपास करत आहेत.

दरम्यान, राखी सावंतचा अटक पूर्व जामीन काल मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर आज तिला अटक करण्यात आली.

- Advertisement -

राखी खासगी आयुष्यामुळे चर्चेत 

राखी सतत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राखी बिग बॉस मराठीतून बाहेर आली. त्यानंतर तिने आदिलसोबत केलेल्या लग्नाची बातमी जाहीर केली. बिग बॉस-14, नच बलिये, बिग बॉस-15 आणि बिग बॉस मराठी-4 या कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

 


हेही वाचा : 

प्रेग्नन्सी आणि गर्भपाताच्या चर्चांवर राखीने दिलं उत्तर; म्हणाली…

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -