‘तिरसाट’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘तिरसाट’  चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटसृष्टीत आता नव-नवीन सुंदर चित्रपटांची निर्मिती होत असताना, आता अजून एका नव्या चित्रपटाची भर पडणार आहे. ‘तिरसाट’ हा नवा आगामी चित्रपट येत्या २० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही फ्रेश जोडी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. प्रेमात न पडणाऱ्या लोकांना देखील प्रेमात पडायला लावणारा चित्रपट “तिरसाट” हा आयुष्याला सकारात्मक करणारा असू शकतो असं म्हटलं जात आहे.

“अँटमगिरी” या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे आता “तिरसाट” हा चित्रपट घेऊन येत आहेत. आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहण्याचा विचार या चित्रपटातून मांडण्यात आला असून नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे.

दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्सने “तिरसाट” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच उमेश शेडगे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. पी.शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं असून चित्रपटाचे संकलन मंगेश जोंधळे यांनी केल आहे. नकार सकारात्मकतेनं पचवला की आयुष्याला अर्थ येतो या आशयसूत्रावर हा चित्रपट बनवला गेला आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरून ही एक प्रेमकहाणी असल्याचे कळत आहे.

 

चंद्रा आणि दौलतची प्रेमकहाणी ‘चंद्रमुखीचा’ ट्रेलर रिलीज

First Published on: April 22, 2022 7:26 PM
Exit mobile version