घरमनोरंजनचंद्रा आणि दौलतची प्रेमकहाणी 'चंद्रमुखीचा' ट्रेलर रिलीज

चंद्रा आणि दौलतची प्रेमकहाणी ‘चंद्रमुखीचा’ ट्रेलर रिलीज

Subscribe

नुकताचं 'चंद्रमुखी' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून,आता यातून एक नवीन व्यक्तिरेखा आपल्या समोर आली आहे, ती म्हणजे सौभाग्यवती दमयंती दौलतराव देशमाने हिची

विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा बहुचर्चित आगामी चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सर्वत्र चालू आहे. या चित्रपटात चंद्राची मुख्य भूमिका अमृता खानविलकर हिने साकारली असून दौलत ही भूमिका आदिनाथ कोठारेने साकरली आहे. आपल्या मोहक अदांनी आणि सुंदर नृत्याने सर्वांनाच प्रेमात पाडणारी ‘चंद्रा’ हिने खासदार दौलतराव देशमानेंनाही वेड लावले. तिची आणि दौलतराव देशमाने यांची अनोखी प्रेमकथा ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळेल.

नुकताचं ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून,आता यातून एक नवीन व्यक्तिरेखा आपल्या समोर आली आहे, ती म्हणजे सौभाग्यवती दमयंती दौलतराव देशमाने हिची. ही भूमिका मृण्मयी देशपांडे साकारणार असून हा प्रेमाचा त्रिकोण असल्याचा ट्रेलरवरून अंदाज येतोय. चंद्रा आणि दौलतराव यांच्या प्रेमकहाणीत दमयंतीच्या येण्याने नाट्यमय ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल.

- Advertisement -

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात, ”ही कथा अतिशय ताकदीची आहे. ज्यावेळी हा चित्रपट मी करण्याचे ठरवले तेव्हाच माझ्या डोक्यात या व्यक्तिरेखा कोण साकारणार हे पक्के होते. त्यामुळे प्रत्येक पात्र आपापल्या भूमिकेत उत्तम बसले आहे. या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट खूप विचार करून करण्यात आली आहे आणि त्याची भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर दिसेलच. चित्रपटातील दमयंती ही व्यक्तिरेखा इतक्या दिवसांनी प्रेक्षकांसमोर आणण्यामागेही आमचा काही विचार होता.” त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

- Advertisement -

मराठी सिनेसृष्टीला ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता दिग्दर्शक प्रसाद ओक आणि लेखक चिन्मय मांडलेकर यांची जबरदस्त जोडी ‘चंद्रमुखी’ सारख्या भव्यदिव्य चित्रपटाच्या निमित्ताने हॅट्रिक करत आहेत.

चित्रपटाची पटकथा आणि संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे यांच्यासोबतच मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, सुरभी भावे, राधा सागर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटातील गाण्यांना गुरु ठाकूर यांचे बोल लाभले असून, या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे.

 

Gutkha ad: गुटख्याच्या जाहिरातीने अक्षय कुमार झाला ट्रोल, माफीनामाही सादर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -