नाटक सुरू होणार! तुमच्या आवडत्या आणि जवळच्या नाट्यगृहात!

नाटक सुरू होणार! तुमच्या आवडत्या आणि जवळच्या नाट्यगृहात!

पुन्हा तीसरी घंटा होणार, पडदा वर जाणार आणि ‘रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून..’ हे शब्द प्रेक्षकांच्या कानी पडणार..कारण पुन्हा नाटक सुरू होणार. गेले अनेक दिवस रसिक प्रेक्षक ज्या गोष्टी अतुरतेने वाट पहात आहेत. ही उत्सुकता निर्माण झाली ती त्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओमुळे. काही दिवसांपूर्वी “शुभारंभाचा नाट्यप्रयोग तुमच्या आवडत्या नाट्यगृहात १२ जुलैला” असा संदेश फिरला आणि सर्वांच्याच भुवया ऊंचावल्या. मराठी नाट्यरसिकांमध्ये जोरदार चर्चा झाली.

आपल्या सगळ्यांचा आवडता, हरहुन्नरी कलाकार हृषिकेश जोशी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच दिग्दर्शनाखाली मराठीतील पहिले वाहिले ‘नेटक’ म्हणजे इंटरनेटवरील लाइव्ह नाटक ‘मोगरा’चा रविवारी १२ जुलै रोजी शुभारंभाचा प्रयोग होत आहे. तेजस रानडे यांनी लिहिलेल्या या नाटकात स्पृहा जोशीसुद्धा असणार आहे. लॉकडाऊनच्या या काळात अशाप्रकारे इंटरनेटवरून सदर होणाऱ्या या नाटकाबद्दल मराठी रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

हे नाटक नेमके कोणते, त्याचा दिग्दर्शक कोण, त्यातील कलाकार कोण, प्रेक्षकांनी ते नेमके कसे पाहायचे, लॉकडाऊनच्या या काळात सर्व चित्रपट-नाट्यगृहे बंद असताना सरकारकडून प्रयोगांना परवानगी कशी मिळाली, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर आता मिळाला आहेत.

“शेकडो वर्षांच्या इतिहासात मराठी रंगभूमीने अनेक आव्हाने पेलली, उलटवून लावली आणि ती नव्या उभारीने समर्थपणे उभी राहिली. निरनिराळे प्रयोग करत आणि बदल घडवून आणत रंगभूमीने आणि रंगकर्मींनी  मराठी नाटक जिवंत ठेवले. ‘मोगरा’च्या माध्यमातून तोच अध्याय पुन्हा एकदा गिरविला जाणार आहे. मायबाप प्रेक्षक मराठी रंगभूमीने पेललेल्या प्रत्येक आव्हानाच्यावेळी खंबीरपणे नाटकाच्या मागे उभे राहीले आहेत. यावेळीही ते या प्रयोगाच्या मागे उभे राहतील, याची पूर्ण खात्री ठेवत हा अनोखा प्रयोग सादर होणार आहे असे हृषिकेश जोशी म्हणाले.


हे ही वाचा – सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलीस करणार कंगनाची चौकशी कारण…


 

First Published on: July 3, 2020 4:35 PM
Exit mobile version