शेरनीची गर्जना ! विद्या बालनच्या ‘शेरनीचा’ टीजर आऊट

शेरनीची गर्जना ! विद्या बालनच्या ‘शेरनीचा’ टीजर आऊट

विद्या बालनच्या 'शेरनी’चा धमाकेदार ट्रेलर झाला रिलीज!

अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. विद्याचा चित्रपट ‘शेरनी’ हा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. नुकतच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘शेरनी’ चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. विद्या बालनचे चाहते गेल्या एक वर्षापासून सिनेमाची वाट पाहत आहेत. फॅन्सची उत्सुकता पाहत सिनेमाच्या मेकर्सने लवकरच ‘शेरनी’चा टीजर रिलीज करण्याचा निर्णय घेत टीजर रिलीज केला आला आहे. विद्या बालन अभिनीत चित्रपट ‘शेरनी’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याची घोषणा करण्यासाठी, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने आज एका नव्या चित्ताकर्षक अशा टीजरचे रिलीज करत दिली आहे, ज्यात विद्या बालन घनदाट अशा जंगलात दिसत आहे.नुकतच विद्याने सोशल मीडिया अकाऊंट वर पोस्ट करत लिहले आहे की,वाघाला नेहमी मार्ग माहित असतो!# शेरनीची गर्जना ऐकण्यास तयार आहात? हा आहे ऑफिशियल टीजर. ट्रेलर आऊट 2 जून”

विद्याच्या लुक वरुन  दिसून येत आहे की नक्कीच शेरनी मधून विद्या प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देणार आहे. चाहत्यांचा टीजरला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा आणि अमित मसुरकर निर्मित सिनेमा शेरनी मध्ये शरत सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राज, इला अरुण, बृजेंद्र कला, नीरज काबी दमदार अभिनय करताना दिसणार आहेत. शेरनी जून 2021 मध्ये अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज करण्यात येणार आहे.


हे हि वाचा – जेव्हा जेआरडी टाटांनी ट्रॅजेडी किंग दिलीप कुमारला शिकवला होता धडा, स्टारडमची नशा उतरवली होती

First Published on: May 31, 2021 2:25 PM
Exit mobile version