घरमनोरंजनजेव्हा जेआरडी टाटांनी ट्रॅजेडी किंग दिलीप कुमारला शिकवला होता धडा, स्टारडमची नशा...

जेव्हा जेआरडी टाटांनी ट्रॅजेडी किंग दिलीप कुमारला शिकवला होता धडा, स्टारडमची नशा उतरवली होती

Subscribe

अभिनेता दिलीप कुमार यांना त्या दिवशी खूप मोठा धडा मिळाला होता. दिलीप यांनी त्यांच्या बायोग्राफी 'द सब्सटेंस अँन्ड द शॉडो' मध्ये या घटनेची नोंद करत लिहलं आहे

बॉलिवूड मधील ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे सुपरस्टार दिलीप कुमार यांना क्वचित असं कोणी व्यक्ती असेल जो दिलीप कुमार यांना ओळखत नसेल. दिलीप कुमार यांना बघून अभिनेता धर्मेंद्रच नाही तर अनेक कलाकारांच्या डोक्यावर अॅक्टिंगच भूत नाचू लागलं होतं. दिलीप कुमार यांना बॉलिवूड मधील लेजंड अभिनेता म्हणून संबोधले जाते. पण एक दिवस देशातील सर्वात मोठे उद्योगपाती जेआरडी टाटा(JRD Tata) यांनी दिलीप कुमार यांच्या स्टारडमची एका झटक्यात पाय उतरणी केली. तर आज तुम्हाला जेआरडी टाटा यांनी कशा प्रकारे बॉलिवूड मधील दिग्गज अभिनेता म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार यांच्या स्टारडमची नशा उतरवली होती. तो किस्सा सांगणार आहोत

दिलीप कुमार यांचे प्रत्येक चित्रपट त्या काळी बॉक्सऑफिस वर धम्माल उडवून देत असतं.त्यांचं नशीब फळफळत होतं. लोकप्रियता यशाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहोचली होती. त्यावेळेची ही गोष्ट आहे.  दिलीप कुमार एकदा फ्लाइटने प्रवास करत होते तेव्हा त्यांच्या बाजूच्या सीटवर प्रसिद्ध बिझनेसमॅन जेआरडी टाटा सुद्धा प्रवास करत होते. टाटा यांनी दिलीप कुमारला पाहून तोंड वाकडे केले. खरं तर टाटांनी दिलीप कुमार यांना ओळखले नव्हते. टाटायांचे अशा प्रकारचे वागणे पाहून दिलीप कुमार यांना आश्चर्य वाटले आणि कुतुहलाने त्यांनी विचारले की तुम्ही चित्रपट नाही पाहत का ? टाटा यांनी उत्तर दिले की मी खूप कमी सिनेमा पाहतो. पुढे दिलीप यांनी प्रश केला जर तुम्ही विंडो सीटवर बसून व्हयू एंजॉय करत असणार आणि अचानक एक अॅक्टर तुमच्या बाजूला येऊन बसला तर तुम्ही काय करणार? टाटांनी काहीच उत्तर दिले नाही. दिलीप यांना प्रतीप्रश्न करत टाटांनी विचारले तुम्ही काय काम करतात? तेव्हा दिलीप कुमार म्हणाले मी एक अभिनेता आहे. या नंतर त्यांनी काहीच रिसपॉन्स दिला नाही.

- Advertisement -

अभिनेता दिलीप कुमार यांना त्या दिवशी खूप मोठा धडा मिळाला होता. दिलीप यांनी त्यांच्या बायोग्राफी ‘द सब्सटेंस अँन्ड द शॉडो’ मध्ये या घटनेची नोंद करत लिहलं आहे की,’तुम्ही कितीही मोठे असाल पण तुमच्या पेक्षा नक्कीच कोणी नं कोणी मोठा नक्की असतो’ या घटणे नंतर दिलीप कुमार यांचा स्टारडमची  नशा पुरती उतरली होती.

- Advertisement -

हे हि वाचा – वडिलांची हस्तलिखिते गहाळ झाल्याने बिग बींना राग अनावर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -