‘एक व्हिलन २’च्या चित्रीकरणाला सुरुवात, मोहितसोबत पुन्हा काम करण्यास अर्जून कपूरची उत्सुकता

‘एक व्हिलन २’च्या चित्रीकरणाला सुरुवात, मोहितसोबत पुन्हा काम करण्यास अर्जून कपूरची उत्सुकता

मोहित सुरी दिग्दर्शित ‘एक व्हिलन ‘या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची दमदार कॅमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळाली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूर आता ‘एक व्हिलन २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सज्ज झाला आहे. गोव्यात या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. मोहित सुरी या ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत पुन्हा एकदा गोव्यासारख्या निसर्गरम्या ठिकाणी जाण्यासाठी अर्जून उत्सुक आहे. अर्जूनसोबत या चित्रपटात जॉन अब्राहम , तारा सुतारिया, दिशा पाटनी यांच्याही भूमिका असणार आहेत. याबाबत एक पोस्ट अर्जून ने त्यांच्या इन्स्टाग्रामवर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना अर्जून म्हणाला, “मोहितसोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी मी केव्हापासूनच वाट बघत होतो. हाफ गर्लफ्रेंडच्या चित्रीकरणाच्या वेळचा माझा अनुभव एक कालाकार म्हणून समृध्द करणारा होता.


हे वाचा-सुपरहिट दक्षिणात्य चित्रपट ‘अन्नियन’च्या हिंदी रिमेक मध्ये झळकणार रणवीर सिंग

First Published on: April 15, 2021 3:59 PM
Exit mobile version