‘द हिंदू बॉय’ चित्रपटातून पुन्हा एकदा पहायला मिळणार काश्मिरी पंडितांच्या व्यथा

‘द हिंदू बॉय’ चित्रपटातून पुन्हा एकदा पहायला मिळणार काश्मिरी पंडितांच्या व्यथा

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित बहुचर्चित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटानंतर काश्मीर पंडितांच्या भूतकाळातील आणि वर्तमानातील सध्याची स्थितीवर आधारित ‘द हिंदू बॉय’ चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’च्या यशानंतर निर्माते पुनीत बालन  त्यांचा नवा बॉलिवूड चित्रपट ‘द हिंदू बॉय’ घेऊन येणार आहेत. अभिनेता शरद मल्होत्रा या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.

‘द हिंदू बॉय’ या चित्रपटामध्ये एका तरूण पंडित मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे. ज्याला त्याच्या सुरक्षेसाठी काश्मीरच्या बाहेर पाठवण्यात आले होते आणि तो जेव्हा ३० वर्षानंतर परत आला तेव्हा त्याला काय अनुभव येतात? आणि त्याच्यासोबत पुढे काय होते? हे सर्व दाखवण्यात येणार आहे.

या चित्रपटाचे निर्माते पुनीत बालन म्हणतात की, “मी नेहमी काश्मीरला जातो आणि त्यांचे दुःख खूप जवळून पाहतो. त्यांची वाईट परिस्थिती पाहून मला खूप त्रास होतो. मला नेहमीच त्यांच्यासाठी काहीतरी करायचे होते. त्यामुळे जेव्हा हा चित्रपट माझ्याकडे आला तेव्हा मी याची निर्मिती करायचे ठरवले.”

‘द हिंदू बॉय’ चित्रपटाचे दिग्दर्शन शाहनबाज बाकल यांनी केले असून या चित्रपटाच्या कथेचे आणि पटकथेचे लेखन सुद्धा त्यांनीच केले आहे. अभिनेता शरद मल्होत्रा या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. शरद मल्होत्राने यापूर्वी ‘नागिन ५’, ‘विद्रोही’,’एक तेरा साथ’, ‘कसम’ यांयारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अजून समोर आली नाही.


हेही वाचा :‘पृथ्वीराज’ चित्रपटातील ‘हरिहर’ गाण्याला मराठमोळ्या आदर्श शिंदेचा आवाज

First Published on: May 13, 2022 1:07 PM
Exit mobile version