आगामी सिरीज ‘जुबली’चा ट्रेलर प्रदर्शित

आगामी सिरीज ‘जुबली’चा ट्रेलर प्रदर्शित

अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज आपली आगामी ओरिजनल सिरीज ’जुबली’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. 10 भागांची फिक्शनल ड्रामा असलेल्या या सिरीजचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केले आहे तर, याची निर्मिती सौमिक सेन आणि मोटवानी यांनी केली आहे. दरम्यान, रिलायंस एंटरटेनमेंट आणि फँटम स्टुडिओच्या सहयोगाने एंडोलन फिल्म्सद्वारा निर्मित या सिरीजची पटकथा आणि संवाद अतुल सभरवाल यांनी लिहिले आहेत तसेच, यामध्ये अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेला सदाबहार साउंडट्रॅक आहे.

अशातच, या शोमध्ये प्रसेनजीत चॅटर्जी, अदिती राव हैदरी, अपारशक्ती खुराना, वामिका गब्बी, सिद्धांत गुप्ता, नंदिश संधू आणि राम कपूरसह श्वेता बसु प्रसाद, अरुण गोविल, सुखमणी लांबा, आर्य भट्ट, नरोत्तम बैन, आलोक अरोरा यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व कलाकारांची टीम आहे. यात सुहानी पोपली मुख्य भूमिकेत आहे. अशातच, भारत आणि २४० देश आणि प्रदेशांमधील प्राइम सदस्यांसाठी ७ एप्रिल रोजी भाग एक (एक ते पाच भाग) स्ट्रीम करू शकतात, तर भाग २ (भाग सहा ते दहा) पुढील आठवड्यात १४ एप्रिल रोजी प्रदर्शित केले जातील.

’जुबली’चा हा आकर्षक ट्रेलर प्रेक्षकांना भारतीय सिनेमातील सुवर्णकाळाच्या मोहक जगाची ओळख करून देतो. बॉलीवूडमधील सुवर्णकाळाच्या पार्श्‍वभूमीवर आधारित, ‘जुबली’ एक असा ड्रामा आहे जिथे एक स्टुडिओ बॉस, त्याची फिल्म-स्टार पत्नी, एक विश्वसनीय सहयोगी, एक उगवता तारा, एक भोळी मुलगी आणि एक शरणार्थी आणि त्यांच्याद्वारा खेळल्या जाणाऱ्या जुगार ची कथा आहे. आपली स्वप्ने, महत्वाकांक्षा आणि प्रेमाचा पाठलाग करण्यासाठी पुन्हा तयार आहेत.


हेही वाचा :

उर्फीला भेटला बॉयफ्रेंड; नेटकरी म्हणाले… त्याला कपड्यांवर खर्च करावा लागणार नाही

First Published on: March 24, 2023 5:34 PM
Exit mobile version