‘The Truth Shines…’; क्रांती रेडकरची पुन्हा एकदा पती समीर वानखेडेंना साथ

‘The Truth Shines…’; क्रांती रेडकरची पुन्हा एकदा पती समीर वानखेडेंना साथ

Kranti Redkar once again supported her husband Sameer Wankhede

बेहिशेबी मालमत्ता आणि अन्य भ्रष्टाचार प्रकरणाबरोबरच आर्यन खान प्रकरणात आता नवीन खुलासे होत आहे. समीर वानखेडे यांनी या प्रकरणात शाहरुख खानकडून 25 कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यातच आता समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान ते अनेक पुरावे लपवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. समीर वानखेडे यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आता पुन्हा एकदा आपल्या पतीला साथ दिली आहे. तिने समीर वानखेडे यांचं समर्थन करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने अतिशय शांतपणे आपलं म्हणणं मांडलं आहे. ( The Truth Shines Kranti Redkar once again supported her husband Sameer Wankhede )

क्रांती रेडकरची पोस्ट काय?

क्रांती रेडकर हिने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने कोणाचंही नाव न घेता तिच्या नवऱ्याविरुद्ध होणाऱ्या कारवाईंबद्दल भाष्य केलं आहे.

क्रांतीने अतिशय मार्मिकपणे तिचे मत या व्हिडीओच्या माध्यामातून मांडलं आहे. खरंतर क्रांतीने या व्हिडीओत सत्याचा खरा अर्थ काय हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ती या व्हिडीओत म्हणाली आहे की, मूर्ख बनवण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे जे खर नाही त्यावर विश्वास ठेवणं आणि दुसरं म्हणजे सत्य काय आहे यावर विश्वास ठेवण्यास नकार देणं. पुन्हा ऐका, समजून घ्या, मूर्ख बनू नका, त्याचबरोबर क्रांती रेडकर हिने या व्हिडीओला कॅप्शनही दिलं आहे, ती लिहिते की, The Truth Shines like no Diamond Ever. अशी पोस्ट शेअर करत तिने आपल्या नवऱ्याला पाठिंबा दर्शवला आहे.

( हेही वाचा: ज्येष्ठ तेलुगू संगीतकार राज यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन )

नेमकं प्रकरण काय?

हाय प्रोफाईल क्रूझ प्रकरणाच्या तपासादरम्यान समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात त्यांच्या बचावात चॅट्स सादर करुन वर्तन नियमांचं उल्लंघन केलं असल्याचं एनसीबीच्या सुत्रांनी सांगितलं आहे. आता याच प्रकरणात वानखेडे यांच्यावर दररोजच नवनवीन आरोप होत आहेत. तर दुसरीकडे मात्र, एनसीबीचे माजी अधिकारी वानखेडे म्हणाले की, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून तपासात मी सहकार्य करेन, वंदे मातरम्.

 

First Published on: May 22, 2023 10:33 AM
Exit mobile version