‘द कपिल शर्मा’च्या चौथ्या पर्वात असणार ‘हे’ नवे 5 कलाकार

‘द कपिल शर्मा’च्या चौथ्या पर्वात असणार ‘हे’ नवे 5 कलाकार

हिंदी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय रियालिटी शो ‘द कपिल शर्मा’ येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. 10 सप्टेंबर पासून हा शो टेलिव्हिजनवर दाखवला जाईल. या कार्यक्रमाचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या शोची वाट पाहत आहेत. ‘द कपिल शर्मा’ शोचा हा चौथा सीझन असून यामध्ये यावेळी अनेक नव्या कलाकारांची भर पडणार आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमातून कृष्णा अभिषेक बाहेर झाला आहे. आर्थिक वादावरून त्याने शो सोडला असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता या शोच्या नव्या सीझनमध्ये कृष्णाच्या जागी नवे कलाकारांची एन्ट्री होणार आहे. आता हे पाच नवे कलाकार काय कमाल करणार हे प्रेक्षकांसाठी पाहण्याची गोष्ट आहे.

‘द कपिल शर्मा’च्या चौथ्या पर्वात असणार हे नवे 5 कलाकार

कृष्णा अभिषेकने का सोडला कार्यक्रम?
‘द कपिल शर्मा’ या शोमध्ये कृष्णा साकारत असलेली सपनाच्या भूमिकेने सगळ्यांना खळखळून हसवले. मात्र, या नव्या पर्वात सपना ही भूमिका साकारणारे कृष्णा दिसणार नसल्याने चाहते निराश झाले आहेत. या शोमधून बाहेर पडण्यामागचे कारण कृष्णा अभिषेकने सांगितले. खरंतर, या शोच्या करारातील समस्यांमुळे त्याने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या कार्यक्रमाशी संबंधीत एका व्सक्तीने सांगितले की, या शोचे निर्माते आणि कृष्णाने सर्व गोष्टी ठिक करण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु आर्थिक व्यवहारामुळे कृष्णाने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला होता.


हेही वाचा : माझी बाजू न मांडता तुझी इज्जत वाचवली…उर्वशी रौतलेचा ऋषभ पंतवर निशाणा

First Published on: August 27, 2022 12:31 PM
Exit mobile version