घरमनोरंजनमाझी बाजू न मांडता तुझी इज्जत वाचवली...उर्वशी रौतलेचा ऋषभ पंतवर निशाणा

माझी बाजू न मांडता तुझी इज्जत वाचवली…उर्वशी रौतलेचा ऋषभ पंतवर निशाणा

Subscribe

उर्वशीने परत एकदा ऋषभ पंकवर निशाणा साधला आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम वर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये आपल्या सुंदर अदा दाखवत आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने मागील काही दिवसांपूर्वी एका इंटरव्यूमध्ये इशाऱ्या-इशाऱ्यामध्ये ऋषभ पंतचा उल्लेख केला होता आणि सांगितलं होतं की, तिने एका हॉटेलच्या लॉबीमध्ये त्याचा जवळपास 10 तास वाट पाहिली होती. त्यानंतर ऋषभ पंतने उर्वशीचं नाव न घेता तिच्यावर स्वस्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आरोप केला होता.

दोघांमध्ये सोशल मीडियावर वाद सुरू झाला. त्यानंतर उर्वशीने ऋषभचं नाव न घेता त्यावर आरोप केला होता.दरम्यान, उर्वशीने पुन्हा एकदा ऋषभ पंतला टोला लगावला आहे. कारण, तिने आपला एक व्हिडीओ शेअर केला ज्याचा सबंध लोक ऋषभ पंतशी जोडत आहेत.

- Advertisement -

उर्वशीने शेअर केला व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

उर्वशीने परत एकदा ऋषभ पंकवर निशाणा साधला आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम वर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये आपल्या सुंदर अदा दाखवत आहे. तसेच या व्हिडीओ खाली तिने एक कॅप्शन देखील लिहिलं आहे, “मी गोष्टीतली माझी बाजू न सांगता तुमची इज्जत वाचवली.”

- Advertisement -

चाहत्यांनी ऋषभ पंतचं घेतलं नाव
उर्वशीची पोस्ट पाहून अनेक चाहते ऋषभ पंतचा उल्लेख करू लागले. नेटकऱ्यांच्या वाटत की, उर्वशीने इशाऱ्या-इशाऱ्यामध्ये ऋषभ पंतवर मोठा निशाणा साधला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मागील काही वर्षांपूर्वी उर्वशी आणि ऋषभ पंत मुंबईमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु आता दोघांमध्ये काहीही सुरळीत चालू नसल्याचं म्हटलं जात आहे.


हेही वाचा : ‘एका काळेचे मणी’ धमाल वेबसिरीज लवकरच होणार प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -