रेस 3 मधून ‘हा’ अभिनेता करतोय कमबॅक

रेस 3 मधून ‘हा’ अभिनेता करतोय कमबॅक

रेस ३ साठी केला लूक चेंज

दरवर्षी ईदच्या मुहुर्तावर इदी घेऊन बॉलीवूडचा दबंग सलमान खान नवा सिनेमा घेऊन येत असतो. यंदाची ईदही खास असणार आहे. कारण भाईजानचा ‘रेस ३ ‘ हा सिनेमा रिलीज होत आहे. अॅक्शननी खचाखच भरलेला या सिनेमात एका असा चेहरा पुन्हा आलाय ज्याला तुम्ही खूप वर्षांनी बीग बजेट सिनेमात बघणार आहात. आता हे वाचल्याबरोबर हा चेहरा कोण हे पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच गुगलची मदत घेतली असेल, पण थोड थांबा! हा अभिनेता कोणी नसून बॉबी देओल आहे.

सिनेमासाठी केले ‘केटो’ डाएट

सल्लूभाईचा सिनेमा म्हणजे अॅक्शन असणार यात काही शंका नाहीच. या सिनेमासाठी बॉबी देओलचे कास्टिंग केल्यानंतर त्याने त्याच्या रोलसाठी विशेष मेहनत घेतली आहे. अगदी वजन कमी करण्यापासून ते मस्क्युलर बॉडीपर्यंत त्यांने मेहनत घेतली आहे. .यासाठी त्याने केटोजनिक डाएट केल्याचे कळत आहे. त्याचा हा बॉडी चेंज ट्रेलरमधून दिसतोच आहे.

रेस ३ मधून कमबॅक

९० च्या दशकात बॉबी देओलने अनेक हिट सिनेमे दिले. पण मधल्या काळात त्याचा लक्षात राहिल असा सिनेमा आला नाही. ‘यमला पगला दिवाना’ या त्याच्या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी जादू चालली नाही.त्यानंतर मराठी सिनेमावर आधारीत पोस्टर बॉईज या हिंदी सिनेमाही फारसा चालला नाहीत. आता रेस ३ मधून पुन्हा एकदा तो बीग बजेट सिनेमात कमबॅक करत आहे. त्यामुळे बॉबी देओलच्या चाहत्यांना त्याला मोठया पडद्यावर एका वेगळ्या अवतारात पाहता येणार आहे.

रेस ३ ची बझ कायम

रेस ३ रिलीसाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. हा सिनेमा रिलीजआधीच अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल झाला आहे. हा सिनेमा त्याच्या मेकींगपासूनच चर्चेत आहे. ‘अल्ला दुहाईये’ या गाण्याने तर या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवली. रेमो डिसोझाने या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून ट्रेलरमधून त्याच्या दमदार दिग्दर्शनाचा अंदाज येत आहे.

पहिल्या दोन भागांशी होणार तुलना?

रेस 3 चे पहिले दोन भागही तितकेच हिट होते. २००८ साली पहिला रेस सिनेमा आला. यात सैफ अली खान, अनिल कपूर, कतरिना कैफ, बिपाशा बासू, अक्षय खन्ना होता.  २०१३ साली रेस २ आला त्यात दिपिका पदुकोण, सैफ अली खान जॅकलिन फर्नांडिस, जॉन अब्राहिम ही स्टारकास्ट होती. पण हा सिनेमा तितका चालला नाही. आता  रेस ३ च्या या रेसमध्ये डेझी  शहा आणि बॉबी देओल हे नवे चेहरे दिसणार आहेत.

(सौ. टिब्स ऑफिशिअल)

(सौजन्य- सलमान खान ऑफिशिअल)

 

First Published on: June 13, 2018 8:51 AM
Exit mobile version