‘नाटू-नाटू’ला ऑस्कर मिळवून देण्यात ‘या’ व्यक्तीचा मोलाचा वाटा

‘नाटू-नाटू’ला ऑस्कर मिळवून देण्यात ‘या’ व्यक्तीचा मोलाचा वाटा

साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला नुकताच ‘बेस्ट ओरिजिनल साँग’ हा ऑस्कर पुरस्कार मिळाला. ही बातमी सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. ‘नाटू नाटू’ या गाण्याने 95 व्या ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यात हॉलिवूडमधील टेल इट लाइक अ वुमन, होल्ड माय हँड फ्रॉम टॉप गन: मॅव्हरिक, लिफ्ट माय अप फ्रॉम ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर, आणि धिस इज ए लाइफ फ्रॉम एव्हरीथिंग, एव्हरीव्हेअर, ऑल अॅट वन्स यांसारख्या गाण्यांना मागे टाकत इतिहास रचला आहे. ऑस्कर पुरस्काराआधी या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील जिंकला होता.

‘नाटू-नाटू’ला ऑस्कर जिंकवण्यासाठी या व्यक्तीचा हात

संगीत दिग्दर्शक म्हणून केली करीअरची सुरुवात

एम एम कीरावानी यांनी तेलुगु चित्रपटात सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. ज्येष्ठ गीतकार वेतुरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केले. मौलीचा 1990 चा चित्रपट ‘मनसु ममता’ हा त्यांचा पहिला मोठा ब्रेक होता ज्याने त्यांना तेलगू चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा मार्ग मोकळा झाला.

आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी

एमएम कीरावानी यांनी ऑस्करसारख्या प्रसिद्ध सन्मानापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. कीरावनी यांनी ‘बाहुबली 2’ साठी सॅटर्न अवॉर्ड नामांकन नोंदवले आहे. तसेच त्यांच्या ‘नाटू-नाटू’ गाण्याने सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीमध्ये ‘गोल्डन ग्लोब’ आणि ‘क्रिटिक्स चॉईस’ अवॉर्ड्ससह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.

 


हेही वाचा :

गौरवास्पद! भारताला मिळाले दोन ऑस्कर पुरस्कार, नाटू नाटू गाणं ठरलं बेस्ट ओरिजिनल साँग

First Published on: March 13, 2023 9:42 AM
Exit mobile version