पुन्हा एका टिकटॉक स्टारने केली आत्महत्या

पुन्हा एका टिकटॉक स्टारने केली आत्महत्या

पुन्हा एका टिकटॉक स्टारने केली आत्महत्या

नैराश्यामुळे अजून एका टिकटॉक स्टारने आपले जीवन संपवले आहे. काही दिवसांपूर्वी टिकटॉक स्टार सिया कक्कडने आत्महत्या केली होती. आता टिकटॉक स्टार संध्या चौहान हिने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. संध्या दिल्ली विद्यापिठाची विद्यार्थीनी होती. ती केवळ १८ वर्षाची असल्याची म्हटले जात आहे. संध्याच्या आत्महत्येप्रकरणी कोणतीही सुसाइड नोट पोलिसांना मिळालेली नाही आहे. सध्या पोलिस संध्याच्या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

माहितीनुसार, सिया कक्कड प्रमाणे संध्या देखील नैराश्याची शिकार झाली होती. गेल्या दोन महिन्यापासून ती नैराश्यात होती आणि शेवटी तिने आयुष्य संपवून घेतले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पहिल्यांदा संध्याचा मृतदेह तिच्या चुलतभावाने पाहिला होता. त्यानंतर त्याने पोलिसांना आणि कुटुंबियांना याबाबत सांगितले. तातडीने संध्याला एसडीएस ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी संध्याला मृत घोषित केले. कुटुंबियांचे म्हणणे आहे की, संध्या नैराश्यात होती पण आत्महत्या करण्यामागचे खरे कारण काय आहे? याचा पोलिस तपास करत आहेत. संध्याचा पोलिसांनी फोनही जप्त केला आहे. जेणेकरून तपासणी दरम्यान तिच्या फोनवरून काही सुगावा मिळेल.

सुत्राच्या माहितीनुसार, संध्या टिकटॉक बंदीमुळे अस्वस्थ झाली होती. भारत सरकार काही दिवसांपूर्वी चीनच्या ५९ अॅप्सवर बंदी घातली. भारत आणि चीनमधील वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने हा निर्णय घेतला.

दरम्यान २६ जून रोजी टिकटॉक स्टार सिया कक्कडने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सध्या दिल्ली पोलिस सियाच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी करत आहे. तसेच या संदर्भात पोलिस सियाचे नातेवाईक, शाळेतील मित्रांकडून सतत चौकशी करत आहेत. शिवाय या प्रकरणाबाबत सियाच्या मॅनेजरचीही चौकशी केली आहे. सियाचा फोन देखील जप्त पोलिसांनी जप्त केला आहे.


हेही वाचा – TikTok स्टार सिया कक्कडने केली आत्महत्या


 

First Published on: July 6, 2020 4:32 PM
Exit mobile version