Top Trends in Search 2021: २०२१मध्ये गूगलवर सर्वाधिक सर्च झालेले बॉलिवूड सेलिब्रेटी कोणते? जाणून घ्या

Top Trends in Search 2021: २०२१मध्ये गूगलवर सर्वाधिक सर्च झालेले बॉलिवूड सेलिब्रेटी कोणते? जाणून घ्या

Top Trends in Search 2021: most searched Bollywood celebrity on Google in 2021

वर्षांतील अखेरचा महिना सुरू झालाय. २०२१ हे वर्ष मागील वर्षापेक्षा फार वेगळे होते. अनेकांसाठी हे वर्ष फार आनंदी तर अनेकांसाठी हे वर्ष फार त्रासदायक ठरलं. २०२१ वर्षात गूगलने सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या लोकांची यादी जाहीर केली आहे. ज्यात काही बॉलिवूड कलाकारांची देखील नावे आहेत. काही कलाकार हे त्यांच्या चांगल्या कामांमुळे सर्च झालेत तर काही कलाकार हे वाईट कारणांमुळे. कोण आहेत २०२१मध्ये गूगलवर सर्वाधिक सर्च झालेले बॉलिवूड सेलिब्रेटी जाणून घ्या.

आर्यन खान

२०२१मध्ये गूगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या नावांमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचे नाव आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर आर्यन चर्चेत आला होता. ड्रग्ज प्रकरणातील गंभीर आरोपांमुळे आर्यन खान सर्वात जास्त वेळा सर्च झाला आहे.

शेहनाज गिल

पंजाबची प्रसिद्ध गायिका आणि बिग बॉस १३ची स्पर्धक शेहनाज गिल चर्चेत आली ती म्हणजे अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर. २ सप्टेंबर ला सिद्धार्थचा हार्ट अकॅटने मृत्यू झाला. शेहनाजच्या जाण्याने संपर्ण बॉलिवूडला धक्का बसला मात्र त्याहून मोठा धक्का हा शेहनाज गिलला बसला होता. सिद्धार्थ आणि शेहनाज बिग बॉसपासून सतत एकत्र होते. त्यांची जोडी प्रेक्षकांना फार आवडली होती. शेहनाज आणि सिद्धार्थचे व्हिडिओ त्यावेळी प्रचंड व्हायरल झाले होते. त्यामुळे शेहनाज गूगल सर्च लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

राज कुंद्रा


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्नोग्राफ्री प्रकरणात अटक करण्यात आली आणि त्यानंतर अनेक दिवस राज कुंद्रा चर्चेत होता. मुंबई क्राइम ब्रांचने राज कुंद्राला अटक केली होती त्यानंतर जवळपास एक महिना राज कुंद्रा जेलमध्ये होता. याकाळात राज कुंद्राविषयी अनेक गोष्टींचा उलगडा झाला होता. राज कुद्रांच्या प्रॉपर्टीपासून त्याच्या घरातील वस्तूंपर्यंत लोक गूगलवर प्रचंड प्रमाणात सर्च करत होते.

विक्की कौशल

२०२१मध्ये विक्की कौशल गूगलवर सर्वाधिक सर्च लिस्टमध्ये येण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे त्याचं आणि अभिनेत्री कतरिना कैफचं लग्न. दोघेही राजस्थानच्या सिक्स सेव्हन फोर्टमध्ये लग्न करत आहेत. गेल्या महिन्याभरापासून गूगलवर केवळ विक्की कतरिनाच्या लग्नाच्या चर्चा पहायला मिळत आहेत. त्यामूळेच विक्की कौशल हा २०२१च्या सर्वाधिक सर्च लिस्टमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.

नताशा दलाल

बॉलिवूड अभिनेता वरुण धवल याने काही दिवसांपूर्वी त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल हिच्याशी लग्न केलंय. अनेक वर्ष दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यांचे फॅन्स त्यांच्या लग्नाची आतूरतेने वाट पाहत होते. कोरोनाचे नियम पाळून दोघांनी २४ जानेवारीला लग्न केलं. यावेळी नताशा दलाल काय करते? दोघांचं लग्न कुठे होणार? दोघांची लव्ह स्टोरी कुठे सुरू झाली हे सगळं काही जाणून घेण्यासाठी लोकांनी गूगलवर नताशा दलालला सर्वाधिक वेळा सर्च केलं आहे. नताशा या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा – महेश मांजरेकर म्हणतायत, ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’

First Published on: December 8, 2021 9:29 PM
Exit mobile version