‘आनंदी गोपाळ’चा प्रेरणादायी ट्रेलर, असामान्य लढ्याची कथा

‘आनंदी गोपाळ’चा प्रेरणादायी ट्रेलर, असामान्य लढ्याची कथा

चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्री मिलींद आनंदीबाईंच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. २०१३ मध्ये आलेल्या ‘बालक पालक’ या चित्रपटात भाग्यश्री होती. तर, आनंदीब बाईंच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहिलेले त्यांचे पती गोपाळराव जोशी यांची भूमिका अभिनेता ललित प्रभाकर याने साकारली आहे. ‘जुळून येती रेशीम गाठी’ या मालिकेतून नावारुपाला आलेल्या ललित प्रभाकरचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाचा ट्रेलर पाहताना, आनंदीबाई यांनी महिला डॉक्टर बनण्याचा निर्धार का केला? त्यांच्या या निर्णयात त्यांच्या पतीने त्यांना कशी साथ दिली? या प्रवासादरम्यान त्यांना किती हालअपेष्टा सहन करावा्या लागल्या या सगळ्याची झलक पाहायला मिळते.
ट्रेलरमधील गोपाळराव आणि आनंदी बाईंचे संवाद प्रेक्षकांची मनं जिंकणारी आहेत. ‘ज्या देशास माझ्या धर्मासोबत मी मान्य नाही, तो देश मला मान्य नाही’, हा डायलॉग ट्रेलर पाहाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. आनंदीबाई यांचे वयाच्या दहाव्या वर्षी गोपाळराव जोशी यांच्याशी लग्न झाले होते. आनंदीबाईंनी शिकून स्वत:ची ओळख बनवावी अशी इच्छा असल्यामुळे त्यांनी आनंदीबाईं यांना पुढे शिकवण्याची परवानगी दिली. मात्र, त्याकाळी महिलांना शिकायची परवानगी नसल्यामुळे गोपाळरवांच्या या निर्णयाला जोरदार विरोध झाला, समाजाने या जोडप्याला वाळीत टाकले. मात्र, सगळ्या हालअपेष्टा सहन करुन आनंदीबाई भारताच्या पहिल्या महिल्या डॉक्टर बनल्या. त्यांच्या याच प्रेरणादायी प्रवासाची कथा ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. येत्या १५ फेब्रुवारीला ‘आनंदी गोपाळ’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

First Published on: February 2, 2019 12:33 PM
Exit mobile version