नील-नेहाच्या मैत्री पलीकडील नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘जून’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

नील-नेहाच्या मैत्री पलीकडील नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘जून’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

नील-नेहाच्या मैत्री पलीकडीलं नात्यावर भाष्य करणाऱ्या 'जून' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

काही दिवसांपूर्वी जितेंद्र जोशी (Jitendra Joshi), सिद्धार्थ मेनन(Sidharath Menon), नेहा पेंडसे – बायस(Neha pendase) यांच्यासह ‘जून’च्या टीमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यांचं असं म्हणणं होतं, की अनेक महिन्यांपासून ‘जून इन जून’ च्या चर्चा रंगल्या होत्या. आता तर जून महिनाही संपत आला. कधी येणार आहे हा ‘जून’ (June)प्रेक्षकांच्या भेटीला? आमची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आता तरी ‘जून’ प्रदर्शित करा. प्रेक्षकांसोबतच आता कलाकारही ‘जून’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर ‘जून’ चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे घोषित केले असून या चित्रपटाचा ट्रेलरही आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची अनेक दिवसांची  प्रतीक्षा आता संपली आहे. ‘हिलिंग इज ब्युटीफुल’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘जून’ या चित्रपटाच्या ट्रेलरवरून साधारण अंदाज आला असेलच. नेहा पेंडसे – बायस आणि सिद्धार्थ मेनन यांचं मैत्री पलीकडचं नातं यात पाहायला मिळणार आहे. सुप्री मीडियाचे शार्दुल सिंग बायस, नेहा पेंडसे-बायस आणि ब्लू-ड्रॉप प्रा. लि. चे निखिल महाजन आणि पवन मालू यांनी ‘जून’ची निर्मिती केली आहे.

नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी केले आहे. तर जितेंद्र जोशी, निखिल महाजन यांचे शब्द लाभलेल्या या चित्रपटातील गाण्यांना शाल्मलीने संगीतबद्ध केले आहे. संवेदनशील कथानक लाभलेल्या ‘जून’ने अनेक राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. नुकताच ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये सिद्धार्थ मेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही जाहीर झाला आहे.

 

‘जून’ची निर्माती आणि अभिनेत्री नेहा पेंडसे – बायस ‘जून’ विषयी सांगते, ”जून हा नक्कीच पठडीबाहेरील चित्रपट आहे. मला खूप आनंद होतोय, की ‘जून’च्या निमित्ताने सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. निखिल महाजन याने त्याच्या भावना लिहून एक उत्तम काम केले असून त्याच्या भावनांना सुहृद आणि वैभवने जिवंत केले आहे. हा एक धाडसी विषय असला तरी भावनिक आहे, त्यामुळे दुःखावर हळुवार फुंकर मारत हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल.”


हे हि वाचा – प्रेग्नेंसीच्या चर्चांवर पूनम पांडेने केला खुलासा, म्हणाली आई होणे आनंदाची बाब आहे


 

First Published on: June 23, 2021 2:03 PM
Exit mobile version