Jayeshbhai Jordaar Trailer : रणवीर सिंहच्या ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज

Jayeshbhai Jordaar Trailer : रणवीर सिंहच्या ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह लवकरंच त्याच्या ‘जयेशभाई जोरदार’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. ‘जयेशभाई जोरदार’ या गुजराती भाषेचा तडका असणाऱ्या चित्रपटात रणवीर सोबत तेलगू चित्रपटातील अभिनेत्री शालिनी पांडे सुद्धा दिसून येईल. ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटातून शालिनी पांडे प्रथमच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधी प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबाबत उत्सुकता वाढवण्यासाठी आज (१९ एप्रिल ) रोजी या चित्रपटाचे पहिले ट्रेलर लाँच करण्यात आले आहे. ज्यामध्ये सामाजिक मुद्दे मजेशीर पद्धतीने सांगण्यात येत आहेत.

‘जयेशभाई जोरदार’ च्या या ट्रेलरमध्ये जयेशभाई ही मुख्य व्यक्तीरेखा साकारणाऱ्या रणवीरवर घराण्याचा वंशज(मुलगा) देण्यासाठी जबरदस्ती करणारे त्याचे वडील म्हणजेच बोमन ईरानी यांना तो पुरता वैतागलेला दिसत आहे. खरंतर या चित्रपटात बोमन ईरानी गावचे सरपंच असतात. जिथे मुलींना स्वतंत्रपणे जगण्याची वागणूक दिली जात नाही. त्यामुळे बोमन ईरानी यांना सरपंचाच्या खुर्चीसाठी नातू हवा असतो.

यादरम्यान जयेशभाईची पत्नी शालिनी पांडे प्रेग्नेंट आहे आणि त्यात त्यांना आधीची एक मुलगी आहे. मात्र यावेळी सरपंच बोमन ईरानी यांना नातूचं हवा आहे, नाहीतर मुलगी झाल्यास ते तिची हत्या करण्यास सुद्धा पुढेमागे बघणार नाहीत. नातू व्हावा यासाठी सरपंच आणि त्यांची पत्नी रत्ना प्रत्येक गावातल्या मंदिरांमध्ये जाऊन नवस करतात. याशिवाय आपल्या सूनेची गर्भ तपासणी सुद्धा करतात. जिथे डॉक्टर त्यांच्या सूनेला मुलगी होईल असे सांगतो. मात्र त्यानंतर सुरू होते, खरे युद्ध..कारण सरपंच आणि त्यांची पत्नी मुलीला मारण्यासाठी तयार होतात.

जयेशभाई त्याच्या पत्नीला आणि मुलीला वाचवण्यासाठी त्यांना घेऊन पळून जातो. परंतु सरपंच त्याला शोधून काढतो. ट्रेलरचा शेवट खूप मजेशीर आहे, ज्यात जयेशभाई त्यांच्या मुलीला वाचवण्यासाठी अशी युक्ती शोधून काढतो, जो विचारापेक्षा थोडा वेगळा परंतु खूप मजेशीर आहे.

‘जयेशभाई जोरदार’ चे प्रोडक्शन यश राज फिल्म्सच्या बॅनर खाली करण्यात आले आहे. येत्या १३ मे २०२२ रोजी हा चित्रपट संपूर्ण जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

 

Lond on files : Arjun Rampal साकारणार डिटेक्टिव्हची भूमिका

First Published on: April 19, 2022 4:04 PM
Exit mobile version