घरमनोरंजनLondon files : Arjun Rampal साकारणार डिटेक्टिव्हची भूमिका

London files : Arjun Rampal साकारणार डिटेक्टिव्हची भूमिका

Subscribe

अभिनेता अजुर्न रामपाल यांनी आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर सुद्धा या ट्रेलरबाबत माहिती दिली आहे. तसेच ही वेब सीरीज येत्या २१ एप्रिल रोजी सिलेक्टवर प्रीमीयरवर प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवुड अभिनेता अजुर्न रामपाल लवकरंच एक रोमांचकारी आणि सस्पेंस वाढवणाऱ्या ‘लंडन फाइल्स’ या नव्या वेब सिरीजमध्ये दिसून येणार आहे. लंडन फाइल्स एक इनवेस्टिगेटिव्ह वेब सीरिज आहे. ज्यामध्ये अजुर्न एका डिटेक्टिव्ह भूमिका साकारणार आहे. नुकताच या वेब सीरीजचा पहिला ट्रेलर रिलीज झाला असून यातील अजुर्नची भूमिका प्रेक्षकांचे मन जिंकत आहे.

अभिनेता अजुर्न रामपाल यांनी आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर सुद्धा या ट्रेलरबाबत माहिती दिली आहे. तसेच ही वेब सीरीज येत्या २१ एप्रिल रोजी voot सिलेक्टवर प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun (@rampal72)

- Advertisement -

लंडन फाइल्स ही एक इनवेस्टिगेटिव्ह वेब सीरिज आहे. यातील डिटेक्टिव्ह ओम सिंगची भूमिका साकारणाऱ्या अजुर्न रामपालने लंडनमधील एका हरवलेल्या व्यक्तीची केस घेतल्यानंतर त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांची मालिका या वेब सीरीज्या माध्यमातून दाखवलेली आहे. खरंतर वैयक्तिक आयुष्यातील अनेक संकटांचा सामना करत असलेल्या ओमला मिडीयामधील अमर रॉयच्या हरवलेल्या मुलीची केस घ्यावी लागते.

- Advertisement -

यातील अमर रॉयची भूमिका पूरब कोहली यांनी साकारली आहे. तसेच गोपाल दत्त ,सपना पब्बी, मेधा राणा, सागर आर्य आणि ईवा जेन विलिस हे सुद्धा या वेब सीरीजमध्ये मुख्य भूमिका बजावताना दिसून येतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun (@rampal72)

या वेब सीरीजबद्दल बोलताना अभिनेता अजुर्न रामपाल म्हणाला की, लंडन फाइल्स ही वेब सीरीज मी याआधी केलेल्या सर्व वेब सीरीजपेक्षा वेगळे आहे. खरंतर मी याआधी कधीही भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर असा कोणताही प्रकल्प पाहिलेला नाही.

लंडन फाइल्सचे दिग्दर्शन सचिन पाठक यांनी केले आहे. जार पिक्चर्स निर्मित असलेली ही सहा एपिसोडची वेब सीरीज आहे.


हेही वाचा :Ranbir Kapoor, Alia Bhatt Wedding : आलिया रणबीर थिरकले मलायकाच्या पॉप्युलर गाण्यावर; व्हिडिओ व्हायरल…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -