सुशांत सिंग राजपूतचा जुडवा; सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल

सुशांत सिंग राजपूतचा जुडवा; सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल

सुशांत सिंग राजपूतचा जुडवा; सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूने त्याच्या सर्व चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी त्याच्या आत्महत्ये प्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत. तर बरेच जण अजूनही सुशांत सिंगचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. त्यातच सुशांतसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या एका तरुणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या तरुणाचे नाव सचिन तिवारी असे आहे.

हुबेहुब सुशांत सिंग

नेटकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, सचिनचा चेहरा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्याशी अगदी मिळता जुळता आहे. तसेच या तरुणाती चालण्याची पद्धत आणि डान्सच्या स्टेप्स देखील सुशांतशी मिळत्या जुळत्या आहे, अशा एक ना अनेक चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. सुशांत या जगात नाही. पण, सुशांतसारख्या दिसणाऱ्या सचिनला पाहून चाहते सुखावले आहे. तसेच चाहत्यांनी आता सचिनचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचा धडाका लावला आहे.

चाहत्यांनी सचिनला दिला सल्ला

सुशांतच्या चाहत्यांनी सचिनच्या फोटो, व्हिडीओवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्यातील एकाने म्हणटले आहे की, ‘सचिन मी तुमचा मोठा फॅन आहे. कारण सुशांत माझा फेवरेट अॅक्टर होता.’ तर अनेकांनी त्याला एक सल्ला देखील दिला आहे. त्याला चक्क सुशांतच्या वडिलांना भेटण्यास सांगितले आहे. दरम्यान, सचिन हा इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असतो. त्याचे इन्स्टाग्रामवर १० हजरांवर फॉलोअर्स आहेत. मात्र, आता त्याचे फॉलोअर्स वाढण्याची शक्यता काही नाकारता येत नाही.


हेही वाचा – सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिताच्या बॉयफ्रेंडने घेतला ‘हा’ निर्णय!


First Published on: July 10, 2020 11:52 AM
Exit mobile version