करणसोबतच्या ब्रेकअपवर अनुषाचा खुलासा

करणसोबतच्या ब्रेकअपवर अनुषाचा खुलासा

करणसोबतच्या ब्रेकअपवर अनुषाचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री अनुषा दांडेकर सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते. हिंदी रिअॅटलिटी शो शुटिंगदरम्यानचे अनेक फोटो ती चाहत्यांसह शेअर करते. इतकेच नाही तर वैयक्तिक आयुष्यातील तसेच अभिनेता करण कुंद्रासोबतच्या नात्याचे फोटोही ती सतत शेअर करत असायची. गेली अनेक वर्षे अभिनेत्री अनुषा दांडेकर आणि अभिनेता करण कुंद्रा एकमेंकांना डेट करत होते. मात्र २०२० जानेवारीपासून या दोघांमध्ये ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. या ब्रेकअपबद्दलच्या चर्चांवर अद्याप दोघांनीही खुलासा केला नव्हता. मात्र आज अनुषाने न राहून जाहीर खुलासा केले आहे.

अनुषाने एक इंस्टाग्राम पोस्टमध्ये रिलेशनशिपमध्ये तिची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. अनुषाने इंस्टाग्रामवर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटले की, करणने तिला फसवले आहे. ब्रेकअपच्या चर्चाबाबत चाहत्यांनी इंस्टाग्रामवरून तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला होता. दरम्यान दुसऱ्या एक चाहत्याने तिला प्रश्न विचारला, ब्रेकअपनंतर तुम्ही स्वतःला कसं सांभाळलं? यावर तिने उत्तर दिले, त्यावेळेस मी खूप निराश झाले होते. परंतु मी सत्य परिस्थितीचा स्वीकार केला. आणि स्वत:वर प्रेम कसे करायचे हे शिकले.


आणखी एक चाहत्याने तिला करणसोबत असलेल्या रिलेशनशिपबद्दल विचारले, त्यावर तिने उत्तर दिले की, मी पण एक माणूस आहे. मी समोरच्याला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःला विसरले पण माझी फसवणूक झाली, माझ्याशी खोटे बोलले गेले. मला वाटलेलं की समोरचा एकदा तरी माझ्याकडे पुन्हा येऊन माझी माफी मागेल. पण तसं काहीही झाले नाही. पण त्यावेळेस मी स्वतःला सावरायला शिकले. आता मला त्या गोष्टी विसरून पुढे जायला हवं.’ त्यामुळे दोघांमधील ब्रेकअपच्या चर्चा आता खऱ्या ठरल्या आहेत. अद्याप करणने यावर कोणतेही स्टेटमेंट केलेले नाही. अनुषा आणि करणच्या ब्रेकअपने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. कारण दोघे नेहमी वेगवेगळ्या शोमध्ये एकत्र दिसायचे, तसेच अनेक व्हेकेशन प्लॅन एकत्र एन्जॉय करताना दिसायचे.

दरम्यान करणासोबतच्या ब्रेकअपनंतर अनुषाच्या आयुष्यात नव्या आशिकीची एंट्री झाली आहे. हिंदी मालिका अभिनेता जेसन शाहच्या रुपाने अनुषाला नवे प्रेम मिळाले आहे. जेसन शाहने अनुषासह रिलेशनशिपमध्ये असल्याचे स्वत: जाहीर केले आहे. याबाबत सांगताना जेसन शाहने लिहिले की, अनुषा माझ्या आयुष्यात आल्याने माझे आयुष्य अधिक सुंदर झाले आहे. अनुषा आणि जेसन यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात एक म्युझिक अल्बमच्या शुटिंगदरम्यान झाली.


 

First Published on: April 9, 2021 4:52 PM
Exit mobile version