‘तांडव’ वेबसीरिजचा वाद शिगेला; यूपी पोलीस मुंबईत दाखल

‘तांडव’ वेबसीरिजचा वाद शिगेला; यूपी पोलीस मुंबईत दाखल

'तांडव' वेबसीरिजचा वाद शिगेला; यूपी पोलीस मुंबईत दाखल

Amazon Primeची वेबसीरिज ‘तांडव’मधील एका सीनमुळे इतका वाद वाढला आहे. आता उत्तर प्रदेश पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत. या वेबसिरिजच्या निर्मात्याविरोधात लखनऊमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यानंतर आज (बुधवार) उत्तर प्रदेशचे पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत. माहितीनुसार यूपी पोलीस वेबसीरिजशी संबंधित असलेल्या लोकांची चौकशी करण्याची शक्यता आहे.

मुंबईत पोहोचलेल्या या लखनऊ पोलीस पथकात चार सदस्यांचा समावेश आहे. हे पथक वेबसीरिजच्या कास्ट आणि क्रूमधील लोकांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांनी आज सकाळी ट्विट करून सांगितले की, ‘सीरिजच्या निर्मात्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.’ त्यांनी ट्विटमध्ये असे लिहिले की,’ ‘तांडव’ वेबसीरिजचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनी सामाजिक सलोखा बिघाडवण्याचा आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा केला आहे. त्यांच्या कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.’

लखनऊच्या हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने या सीरिजविरोधात निर्मात्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ‘सोशल मीडियावर सीरिजबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर ही सीरिज पाहण्याचा आदेश दिला होता.’ लखनऊ पोलिसांनी सीरिजचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकासह ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Primeचे अधिकारी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा – आणि प्रायव्हेट पार्ट दाखवत ‘त्यानं’ केलं घाणेरडं कृत्य – शर्लिनचा साजिद खानवर आरोप


 

First Published on: January 20, 2021 2:07 PM
Exit mobile version