घरताज्या घडामोडीआणि प्रायव्हेट पार्ट दाखवत 'त्यानं' केलं घाणेरडं कृत्य - शर्लिनचा साजिद खानवर...

आणि प्रायव्हेट पार्ट दाखवत ‘त्यानं’ केलं घाणेरडं कृत्य – शर्लिनचा साजिद खानवर आरोप

Subscribe

जिया खानच्या बहिणीनंतर शर्लिन चोप्राचे साजिद खानवर गंभीर आरोप, केला किळसवाना प्रकार

देशात २०१८ मध्ये #MeToo मोहीमे अंतर्गत बॉलिवूडचा दिग्दर्शन साजिद खानवर अनेक मॉडेलनी गंभीर प्रकार आरोप केले होते. त्यानंतर साजिद खान चांगलाच चर्चेत आला होता. तेव्हापासून साजिद आतापर्यंत माध्यमांसमोर जास्त आला नाही आहे. अजूनही अनेक मॉडेल आता समोर येऊन साजिदने केलेल्या कृत्याबद्दल बोलत आहेत. काही दिवसांपूर्वी BBCचा ‘डेथ इन बॉलिवूड’ ही डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाली होती. यामुळे साजिद खानबद्दल एक खुलासा झाला, जो बॉलिवूड अभिनेत्री झिया खानची बहीण करिश्माने केला आहे. तिने साजिदवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे सांगितले आहे. आता या आरोपानंतर अभिनेत्री शर्लिन चोप्राने साजिद खानवर एक गंभीर आरोप केला आहे. साजिदने तिच्यासोबत किळसवाना प्रकार केल्याचे समोर आले आहे.

शर्लिन चोप्राने साजिद खानने केलेल्या किळसवान्या प्रकाराबाबतचा अनुभव ट्विटवर शेअर केला आहे. शर्लिने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनी २००५ एप्रिलमध्ये साजिदला भेटायला गेले होते. त्यावेळेस त्याने त्याच्या पँटमधून स्वतःचा प्रायव्हेट पार्ट बाहेर काढला. मला स्पष्टपणे आठवते की, त्यावेळेस मी त्याला म्हणाले होती की, मला माहीत आहे, प्रायव्हेट पार्ट कसा असतो. मी त्याला भेटायला गेले होते, इतर गोष्टींसाठी नाही.’

- Advertisement -

यापूर्वी जिया खानची बहीण करिश्माने मोठा गौप्यस्फोट केला होता. हाऊसफुल्ल सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यानची जिया खानसोबत साजिद खानने वाईट कृत्य केले. ‘चित्रपटाची रिहर्सल सुरू होती. त्यावेळेस जिया आपली स्क्रिप्ट वाचत होती. दिग्दर्शक साजिद खान तिच्याजवळ येत टॉप आणि ब्रा काढायला सांगितले. जियाला काय करावे हे सुचत नव्हते. चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले नव्हते आणि असा प्रकार घडल्यावर जिया घरी येऊन रडू लागली. तिने घडलेला सारा प्रकार आपल्याला सांगितला होता’, असे जियाची बहीण करिश्माने सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – सिनेमात काम पाहिजे तर कपडे काढून दाखव; साजिद खानवर मॉडेलचा आरोप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -