Uttarakhand Election 2022: खिलाडी अक्षय कुमार बनला उत्तराखंडचा ब्रँड एम्बेसेडर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Uttarakhand Election 2022: खिलाडी अक्षय कुमार बनला उत्तराखंडचा ब्रँड एम्बेसेडर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Uttarakhand Election 2022: खिलाडी अक्षय कुमार बनला उत्तराखंडचा ब्रँड एम्बेसेडर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

देशातील सध्या पाच राज्यांच्या निवडणूकांचे जोरदार वारे वाहत आहेत. उत्तराखंड विधानसभा निवडणूका (Uttarakhand Election 2022)  सध्या चर्चेत आहेत. अनेक कलाकार सध्या राजकारणात प्रवेश करत आहे. उत्तराखंडमध्ये अभिनेता अक्षय कुमारला ब्रँड एम्बेसेडर म्हणून नेमण्यात आले आहे. ( Akshay Kumar became the brand ambassador of Uttarakhand)  सोमवारी अक्षय कुमारने देहरादून येथे जाऊन उत्तराखंचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami)  यांची भेट घेतली. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन अक्षय कुमारचे स्वागत केले त्याचप्रमाणे त्याला उत्तराखंडची स्पेशल टोपी देखील घातली.

मुख्यमंत्री धामी यांनी म्हटले आहे की, ‘अक्षय कुमार एक अभिनेत्यासह एक चांगला माणूस आहे. आम्ही त्याला राज्याचा ब्रँड एम्बेसेडर होण्यासाठी प्रस्ताव दिला होता तो त्याने मंजूर केला. अक्षय कुमार आता उत्तराखंड राज्याचा ब्रँड एम्बेसेडर म्हणून काम करेल’.

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी अक्षय कुमारला ब्रँड एम्बेसेडर म्हणून घोषित करत त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्याचप्रमाणे अक्षयला उत्तराखंडची खास टोपी घालून चार धाम आणि केदारनाथ मंदिराची प्रतिकृती भेट दिली.

अक्षय कुमार सध्या उत्तराखंडच्या मसूरी येथे एका सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात अक्षयसह अभिनेत्री रकुलप्रीतही दिसणारआहे. काही दिवसांपूर्वी मसूरीतल्या बर्फात शुटींग करतानाचे काही फोटो व्हायरल झाले होते. शुटींगच्या दरम्यानच आज अक्षय कुमारने उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेत राज्याच्या ब्रँड एम्बेसेडरची जबाबदारी स्वीकारली.


हेही वाचा – UP Election 2022: अभिनेत्री माही गिलचा BJPमध्ये प्रवेश

First Published on: February 7, 2022 7:14 PM
Exit mobile version