घरAssembly Battle 2022UP Election 2022: अभिनेत्री माही गिलचा BJPमध्ये प्रवेश

UP Election 2022: अभिनेत्री माही गिलचा BJPमध्ये प्रवेश

Subscribe

माहीने २०२१मध्ये डिसेंबर महिन्यात वॉर्ड २मधून काँग्रेससाठी प्रचार केला होता. हरमोहिंदर सिंह यांच्यासाठी माही लकी ठरली होती.

उत्तर प्रदेश (UP Election 2022) उत्तराखंड (Uttarakhand) आणि चंदीगड ( Chandigarh) सह पाच राज्यातील निवडणूकांना सुरुवात झाली आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान अनेक बॉलिवूड आणि भोजपूरी कलाकार राजकारणात प्रवेश करत आहेत. ‘देव डी’ सारख्या मोठ्या सिनेमात काम करणारी अभिनेती माही गिलने (mahi gill ) देखील राजकारणात प्रवेश करत भाजपचा (BJP) गंडा हाती बांधला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी माही गिलचे चंदीगडमध्ये स्वागत केले आहे. माहीने २०२१मध्ये डिसेंबर महिन्यात वॉर्ड २मधून काँग्रेससाठी प्रचार केला होता. हरमोहिंदर सिंह यांच्यासाठी माही लकी ठरली होती.

अभिनेत्री माही गिलचे खरे नाव रिंपी कौल गिल असे आहे. माही गिल ही चंदीगडच्या पंजाबी परिवारातील आहे. माहीने अनेक बॉलिवूड आणि पंजाबी सिनेमात काम केले आहे. माही पहिल्यांदा २००३मध्ये हवाएं या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर २००९मध्ये अनुराग कश्यपच्या देव डी या सिनेमात माहीने काम केले होते. त्याचप्रमाणे साहेब बीवी और गँगस्टर, दबंग, पान सिंह तोमर, दबंग २, साहेब बीबी और गँगस्टर्स रिटर्न्स त्याचप्रमाणे जंजीर, बुलेट राजा, साहेब बीवी और गँगस्टर ३, दुर्गामती आणि दूरदर्शनच्या अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. पंजाबी तसेच तेलुगू सिनेमातही माहीने काम केले आहे.

- Advertisement -

माफीला देव डी सिनेमातील अभिनयासाठी २०१०मध्ये सर्वात्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्याचप्रमाणे स्क्रिन अवॉर्ड, मोस्ट प्रॉमिसिंग न्यूकमर फिमेल सारखे अवॉर्डही मिळाले आहेत.

माफीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती आधी डान्स करायची डान्स करता करता तिला सिनेमात काम मिळाले. एकदा डान्स करताना अनुराग कश्यपने तिला पाहिले आणि देव डी या सिनेमाची ऑफर दिली.

- Advertisement -

माफीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे झाले तर माहीला एक मुलगी असून तिचे नाव वेरोनिका असे आहे. माहीने फार कमी वयात केले. मात्र ते फार काळ टीकू शकले नाही.


हेही वाचा –  Ram Rahim Singh: पंजाब निवडणुकीच्या तोंडावर राम रहीमची २१ दिवसांची सुट्टी मंजूर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -