मुलींचा क्रश असलेला ‘हा’ सुपरस्टार बॉलिवूडचा फ्लॉप अभिनेता

मुलींचा क्रश असलेला ‘हा’ सुपरस्टार बॉलिवूडचा फ्लॉप अभिनेता

मुलींचा क्रश असलेला 'हा' सुपरस्टार बॉलिवूडचा फ्लॉप अभिनेता

सध्या बॉलिवूड अभिनेता वरुण धवन याचा ‘स्ट्रीट डान्सर ३ डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता लवकरच बॉलिवूड अभिनेता वरुण धवन ‘मिस्टर लेले’ या चित्रपटातून मराठमोळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र ‘मिस्टर लेले’ चा पोस्टर पाहून हा चित्रपट सुपरफ्लॉप होणार असल्याची भविष्यवाणी अभिनेता कमाल खान याने केली आहे. बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून लोकप्रिय झालेला कमाल खान हा नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. बॉलिवूडमधील सुपरफ्लॉप अभिनेता म्हणतं त्याने वरुण धवनवर निशाणा साधला आहे. कमालने ट्विट करून वरुण धवनची खिल्ली उडवली आहे.

फ्लॉप अभिनेता वरुण धवनने सलग सहा फ्लॉप चित्रपट दिले आहेत. आता आणखी एक ‘मिस्टर लेले’ या फ्लॉप चित्रपटासाठी तो तयार आहे. अशाप्रकारचा प्रश्न कमाल यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. सध्या कमाल खानचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या ट्विटवर वरुण धवनच्या चाहत्यांनी जोरदार टीका केली आहे.

वरुणचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘स्ट्रीट डान्सर ३ डी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. या चित्रपटातील भारत आणि पाकिस्तान या देशातील डान्स टीममध्ये होणाऱ्या स्पर्धेबद्दलची कहाणी प्रेक्षकांना फार आवडली आहे. बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमच्या वेबसाइटनुसार वरुण धवनच्या या चित्रपटाने चार दिवसांत ४३ कोटींची कमाई केली आहे.


हेही वाचा – गोलू पोलू साराचा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल


 

First Published on: January 28, 2020 3:48 PM
Exit mobile version