ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर सायंकाळी ५ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर सायंकाळी ५ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर सायंकाळी ५ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar ) यांचे आज सकाळी दिर्घ आजाराने निधन झाले. ते ९८ वर्षांचे वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.  दिलीप कुमार यांनी आज सकाळी मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिपील कुमार यांचे पार्थिव रुग्णालयातून त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आले असून दिलीप कुमार यांच्यावर आज सायंकाळी ५ वाजता शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. दिलीप कुमार यांच्यावर कब्रस्तानात अंतिमसंस्कार करण्यात येणार असून त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार उपस्थित राहणार आहेत. दिलीप कुमार यांच्यावर ज्या कब्रस्तान अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत त्याच कब्रस्तानात मोहम्मद रफी, मधुबाला, मजरुह सुल्तापुरी यासारख्या अनेक सेलिब्रेंटींवर अंतिमसंस्कार करण्यात आले होते. (Veteran actor Dilip Kumar will be cremated at 5 pm in state funeral)

दिलीप कुमार यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना २९ जून रोजी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला. पंतप्रधानांपासून, राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार, बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. दिलीप कुमार यांनी आपल्या भारदस्त अभिनयाने जवळपास तीन दशके गाजवली होती. भारतीय सिनेमांच्या इतिहासात अभिनयाचे विद्यापीठ, ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जात होते.

भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला. अजरामर भूमिका साकारणरे दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या ह्रदयातील स्थानही अजरामर राहिल. ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली,असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींनी देखील दिलीप कुमार यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांच्या पत्नी सायरा बानू यांना फोन करुन धीर दिला.


‘जेव्हा भारतीय सिनेमांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तो दिलीप कुमार यांच्याआधी आणि दिलीप कुमार यांच्या नंतर असा लिहिला जाईल’, असे म्हणतच बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


हेही वाचा – ‘मला मुलगा असता तर तो शाहरुखसारखाचं असता,’ दिलीप कुमार अन् शाहरुख खानचे अनोखं नात

First Published on: July 7, 2021 12:50 PM
Exit mobile version