घरमनोरंजन'मला मुलगा असता तर तो शाहरुखसारखाचं असता,' दिलीप कुमार अन् शाहरुख खानचे...

‘मला मुलगा असता तर तो शाहरुखसारखाचं असता,’ दिलीप कुमार अन् शाहरुख खानचे अनोखं नात

Subscribe

बॉलिवूड सिनेसृष्टीतील सुपरस्टार दिलीप कुमार यांचे आज निधनं झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९८ वर्षाचे होते. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने दिलीप कुमार यांना ३० जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आज आजारासोबतची अखेरची झुंज संपली. दिलीप कुमार यांच्या अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीचा चेहरा मोहरा बदलून गेला. आजही अनेक सुपरहिट कलाकार दिलीप कुमार यांना आपला आदर्श मानतात. सुपरहिट अभिनेत्यापासून ते उतार वयात आजारापणापर्यंत दिलीप कुमार यांची पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो त्यांची सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम होती.

काही वर्षांपूर्वी दिलीप कुमार यांची तब्येत ढासळली होती तेव्हा त्याचा चाहता आणि बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान त्यांना भेटण्यासाठी आला होता. यावेळी सायरा बानो आणि दिलीप कुमार यांनी शाहरुख खानला आपला मुलगा म्हणून संबोधलं होतं. यावेळी दोघेही म्हणाले होते की, ‘आम्हाला मुलगा राहिला असता तर तो नक्कीच शाहरुख खान सारखा दिसला असता. तेव्हापासून शाहरुख खान हा त्यांचा मुलगा झाला. किंग खान आपली मुलगी सुहानासोबत दिलीप साहबच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आला असल्याचे’ सायरा बानो यांनी माध्यमांना सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

- Advertisement -

दिलीप कुमार आणि सायना बानो यांची शाहरुख खानसोबतची पहिली भेट ‘दिल आशना है’ या चित्रपटाच्या स्क्रिनींग वेळी झाली. शाहरुखबरोबर पहिल्या भेटीबद्दल सांगताना सायना बाने म्हणाल्या की,’दिल आशना है’ या चित्रपटाच्या मुहूर्तावर आमची पहिली भेट झाली. यावेळी शाहरुख आणि दिलीप कुमार यांच्यात बऱ्याच गोष्टीत साम्यता दिसली. यातील एक  म्हणजे त्यांच्या डोक्यावरील केस. त्या केसांना स्पर्श केला तर ते एक सारखे वाटतात”. इतकेच काय २०१३ मध्येही शाहरुख खानने एका मुलाखतीत सांगितलं होतं की मी दिलीप कुमार साहेबांसारखा दिसतो.’ असेही त्या म्हणाल्या.

- Advertisement -

‘मुलगा असता तर तो शाहरुखसारखा झाला असता’

सायरा बानो दिलीप कुमार यांना नेहमी सांगायच्या की, ‘मला मुलगा झाला असता तर तो शाहरुखसारखा दिसला असता.’ साहेब आणि शाहरुख एकसारखेच आहेत. विशेष म्हणजे शाहरुखने धुबाला-सलीमच्या पोस्टरवर दिलीप साहबांचे ऑटोग्राफ घेत ते स्क्रीनिंग थिएटरमध्ये ठेवले होते.

एकाच गल्लीत राहत होते शाहरुख खान अन् दिलीप कुमार

बॉलिवूडमधील दोन सुपरस्टार म्हणजे दिलीप कुमार आणि शाहरुख खान दिल्लीच्या एका गल्लीत राहत होते. शाहरुख खान आपल्या वडिलांसोबत नेहमी दिलीप कुमार यांच्या घरी जात असायचे. परंतु ही गोष्ट खूप कमी लोकांनी माहित आहे. आजही दिलीप कुमार यांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक नवोदित कलाकार अभिनय क्षेत्रात आले. दिलीप कुमार सारखं नाव कमावण्याची इच्छा ठेव हे कलाकार बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावत आहेत. यातील एक म्हणजे अभिनेता होता तो म्हणजे शाहरुख खान. मात्र आज शाहरुख बॉलिवूडमधील किंग खान बनला आहे.


Dilip Kumar Death: …आणि दिलीप कुमार मधुबाला यांची प्रेम कहाणी अधूरी राहीली


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -