मराठी चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का, ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन!

मराठी चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का, ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन!

ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्यावर हातकणंगले तालुक्यातील रूई या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावर यांचे कोरोनामुळे निधन झाले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सरोज सुखटणकर यांचे निधन झाल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे,

सरोज सुखटणकर यांनी मराठी चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका पार पाडल्या आहेत. नाटक, मालिका आणि विविध मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केली आहे. सध्या सुरू असलेल्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेत त्यांनी अभिनय केला होता.

‘न्यू भारत नाट्य क्लब’ त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरूवात झाली. तुझं आहे तुझपाशी, प्रेमा तुझा रंग कसा, मुंबईंची माणसं, दिवा जळू दे सारी रात ही नाटकं विशेष गाजली. अलका कुबल यांच्यासोबत केलेला धनगरवाडा हा सरोज सुखटणकर यांचा अखेरचा चित्रपट ठरला. त्यांनी जोतिबाचा नवस, दे दणादण, बळी राजाचे राज्य येऊ दे यासह ८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून सुखटणकर यांना 2006 मध्ये चित्रकर्मी पुरस्कार देण्यात आला होता. २०१७-१८ मध्ये सरोज सुखटणकर यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनयाबद्दल सुखटणकर यांना इतर संस्थांनी देखील पुरस्कार देऊन गौरवले होते.


हे ही वाचा – धक्कादायक! तीन महिन्यात ‘या’ देशात ३६० हत्तींचा रहस्यमयी मृत्यू!


First Published on: September 23, 2020 9:06 PM
Exit mobile version