घरताज्या घडामोडीधक्कादायक! तीन महिन्यात 'या' देशात ३६० हत्तींचा रहस्यमयी मृत्यू!

धक्कादायक! तीन महिन्यात ‘या’ देशात ३६० हत्तींचा रहस्यमयी मृत्यू!

Subscribe

– मागील तीन महिन्यात पूर्व आफ्रिकेमधील बोत्सवन या देशात ३६० हत्तींचा मृत्यू झाला आहे. पाण्यातील साइनोबॅक्टेरीयामुळे या हत्तींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. साइनोबॅक्टेरिया पाण्यामध्ये विषारी द्रव्य सोडतात. हे विषारी पाणी प्यायल्यानेच हत्तीचा मृत्यू होत असल्याचा दावा केला जात आहे. या आधी याच वर्षी मे महिन्यात आणि त्यानंतर जुलैमहिन्यात शेकडो हत्तींचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती.

elephant death
 

मात्र या हत्तींचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे होत आहे याचे गुढ कायम आहे. पण आत्तापर्यंत मरण पावलेल्या हत्तींचे मृतदेह हे तळ्याकाठी किंवा पाणवठ्याजवळ सापडले आहेत. बोत्सवाना सरकारने हत्तींचे सांगाडे प्रयोगशाळेमध्ये पाठवले आहेत. सांगाड्यांचा अभ्यास करून  हत्तींचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास करण्याचे काम सुरू आहे. ज्या परिसरामध्ये हत्तींचे मृतदेह सापडले आहेत तेथील माती आणि पाण्याचे नमुनेही प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मेलेले अनेक हत्तींच्या तोंडाजवळचे केस गळून पडल्याचे निरदर्शनास आलं आहे. हे विषप्रयोगाचे लक्षण आहे. मात्र यासंदर्भातील अहवाल अद्याप समोर आलेला नाही.

- Advertisement -
Africa elephant
आफ्रिका हत्ती

पर्यावरणामधील बदलांमुळे आणि तपामानामध्ये होणाऱ्या बदलांमुळे साइनोबॅक्टेरीया पाण्यात विषारी पदार्थ सोडत असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यासंदर्भातील अहवाल अद्याप समोर आलेला नाही. हे बेकायदेशीर शिकारीचे प्रकरण असते तर इतरही प्राणी मृत आढळले असते. जर पाण्यात विष टाकण्यात आलं असतं तर इतर प्राणीही मेले असते. त्यामुळेच हा एखादा रोग असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

आफ्रिका खंडामध्ये सर्वाधिक हत्ती असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये बोत्सवानाचा समावेश होतो. येथील जंगलांमध्ये एक लाख ३० हजारहून अधिक हत्ती राहतात. आफ्रीकेमधील एक तृतीयांश हत्तींची संख्या ही बोत्सवानामध्ये आहे. त्यामुळेच आता या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर सरकारने तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – बायको माहेरी गेल्याच्या रागात नवऱ्याने केली सासरे आणि मेव्हणीची हत्या!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -