सुप्रसिद्ध तामिळ अभिनेता विवेक यांचे निधन, पंतप्रधानांपासून दिग्गज सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

सुप्रसिद्ध तामिळ अभिनेता विवेक यांचे निधन, पंतप्रधानांपासून दिग्गज सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

सुप्रसिद्ध तामिळ अभिनेता विवेक यांचे निधन, पंतप्रधानांपासून दिग्गज सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेता विवेक यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले. १६ एप्रिलला विवेक यांना हृदय विकारचा झटका आला होता. त्यांनंतर चेन्नई मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण अधिक प्रकृती खालवल्याने विवेक यांचे आदल्या दिवशी १७ एप्रिलला प्राण ज्योत मालवली. त्यांनी १५ एप्रिलला कोरोना लसीकरणाचा डोस घेतला होता. तसेच त्यांनी माध्यमांशी कोरोना लसीकरणाचे महत्व देखील संगितले होते. विवेक यांच्या आकस्मित निधना नंतर दाक्षिणात्य सिनेमा जगतात शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गज कलाकार कमल हसन,रजनीकांत,प्रकाश राज,रकुल प्रीत,ए आर रेहमान तसेच पंतप्रधानांनी ट्विट करत दुख: व्यक्त केले आणि अभिनेता विवेक यांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधानांनी ट्विटर वर अभिनेता विवेक यांबद्दल लिहले आहे की ”नावाजलेला अभिनेता विवेक यांच्या अचानकपणे जण्याने लोकांना दुख झाले आहे. त्यांचे कॉमिक टाईम आणि उत्कृष्ट संवाद हे नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असे. त्यांनी चित्रपट आणि खाजगी आयुष्यात नेहमी समाज आणि पर्यावरणसाठी काळजी व्यक्त केली लोकांचे त्यावर लक्ष केंद्रीत केले. त्यांच्या घरातील सदस्यांना तसेच मित्रांसाठी संवेदना व्यक्त करतो.ओम शांति.”

अभिनेता विवेक यांचे संपूर्ण नाव विवेकानंदन असे आहे. पण त्यांना इंडस्ट्रीमध्ये विवेक या त्यांच्या स्टेज नावाने ओळखले जात असे . विनोदी कलाकार , दूरदर्शन व्यक्तिमत्त्व, पार्श्वगायक तसेच चित्रपटसृष्टीत काम करण्यासोबतच विवेक एक सामाजिक कार्यकर्ते होते. अभिनेता माधवन याच्या ‘रन’ हा सुपरहिट चित्रपट विवेक यांच्यासाठी सिनेजगतामधील सर्वात मोठा ब्रेक ठरला. तसेच त्यांच्या चित्रपटसृष्टीतिल कामगिरी बद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार पद्मश्री ने देखील गौरवण्यात आले होते.


हे हि वाचा – सुशांतसारख कार्तिकला आत्महत्येस भाग पाडू नका, कंगनाचा करण जोहरला इशारा

First Published on: April 17, 2021 3:02 PM
Exit mobile version