तेलुगू चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते चलपती राव यांचे निधन

तेलुगू चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते चलपती राव यांचे निधन

तेलुगु चित्रपटसृष्टीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध तेलुगु ज्येष्ठ अभिनेते कैकला सत्यनारायण यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच तेलुगु चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

ज्येष्ठ अभिनेते चलपती राव यांच्या निधनामुळे कुटुंब, मित्र-परिवार, चाहते यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहते आणि अभिनेते सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त करत आहेत.

600 हून अधिक चित्रपटांमध्ये केलं होतं काम
तेलुगु चित्रपटांमध्ये चलपति राव यांनी विनोदी आणि खलनायकाच्या अधिक भूमिका साकारल्या आहेत. ‘गुदाचारी 116’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अभिनेते चलपती राव यांनी आत्तापर्यंत 600 हून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा मुलगा रवी बाबू हा देखील अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. ‘यमगोला’, ‘युगपुरुष’, ‘ड्राइवर राम’, ‘अकबर सलीम अनारकली’, ‘भले कृष्णा’, ‘शारदा राम’, ‘जस्टिस चौधरी’, ‘बोब्बिली पुली’ यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांना ओळख मिळाली. ‘फाइट विद लॉ’, ‘चोर राम’, ‘अल्लारी अल्लुडु’, ‘अल्लारी’, ‘निन्ने पेल्लादता’, ‘नुव्वे कावली’, ‘सिंहाद्री’, ‘बनी’, ‘बोम्मारिलु’, ‘अरुंधति’, ‘सिन्हा’ आणि ‘दम्मू’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. ‘बंगराजू’ या चित्रपटात त्यांनी शेवटचं काम केलं होतं.

 


हेही वाचा :

तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात एक्स बॉयफ्रेंडला अटक

First Published on: December 25, 2022 4:03 PM
Exit mobile version