कतरिनाच्या घराबाहेर विकी कॅमेऱ्यात झाला कैद

कतरिनाच्या घराबाहेर विकी कॅमेऱ्यात झाला कैद

कतरिना-विक्की भेटी-गाठीच्या चर्चांना उधाण ,कतरिनाच्या घराबाहेर पडतांना विक्की झाला कॅमेरात कैद

बॉलिवूड मधील सिक्रेट कपल विकी कौशल(Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (katrina kaif)या दोघांनी जरी लोकांसमोर अद्याप त्यांच्या रिलेशनशिप बाबत अधिकृतपणे खूलासा केला नसाला तरी अनेकदा दोघांमध्ये होणाऱ्या भेटीगाठींमुळे अनेकांना ठऊक झाले आहे की कुछ तो खिचडी पक रही है. माहितीनूसार काही दिवसांपुर्वी म्हणजेच 8 जून रोजी विकीला त्याच्या कार मधून कतरिनाच्या घराबाहेर जात असतांना पाहिले होते. इतकेच नाही तर नुकतच समोर आलेल्या माहितीनूसार सोमवारी विकी रात्री उशीरापर्यंत कतरिनाच्या बिल्ंडीगच्या ग्राऊंडमधून कारमधून जात असतांना दिसला होता. कतरिनाचा ड्राइवर विकीला कॉलनी पासून बाहेर जाण्यासाठी रस्ता दाखवत होता. दिवाळी मधील एका पार्टीतील दोघांचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोघेही रिलेशनशीपमध्ये आहे अश्या चर्चांना उधाण आले. स्पॉटबॉयच्या महितीनुसार 2019 पासून विकी आणि कतरिना एकमेकांना डेट करत आहेत

सध्या दोघांनीही रिलेशन बाबत उघडपणे चर्चा केली नसली तरी अनेकदा ते सोबत दिसतात. अभिनेता विकी कौशल सध्या लाखो तरूणींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. ‘उरी:द सर्जिकल स्ट्राईक्स’ नंतर तर विकी कौशलच्या प्रेमात सगळेच वेडे झाले आहे. या चित्रपटानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. यात बॉलिवूड अभिनेत्रीही मागे नाहीयेत. अनेक अभिनेत्री सध्या विकीच्या प्रेमात पडल्या आहेत. यामध्ये कतरीनाची भर पडली आहे. सोशल मीडीयावर दोघांच्याही अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. चाहत्यांनी तर दोघांच्याही नावाचे फॅन पेजेस तयार करण्यास सुरुवात केली असून दोघांच्याही प्रत्येक फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत असतो


हे हि वाचा -तापसी पन्नूला शेवटच्या क्षणी चित्रपटातून काढले बाहेर,नंतर निर्मात्याने मागितली होती माफी


 

First Published on: June 29, 2021 1:43 PM
Exit mobile version