घरमनोरंजनतापसी पन्नूला शेवटच्या क्षणी चित्रपटातून काढले बाहेर,नंतर निर्मात्याने मागितली होती माफी

तापसी पन्नूला शेवटच्या क्षणी चित्रपटातून काढले बाहेर,नंतर निर्मात्याने मागितली होती माफी

Subscribe

2019 मध्ये आलेला सिनेमा 'पति, पत्नी और वो' मधून तापसीला रिप्लेस करण्यात आले असल्याची माहिती समोर आली होती

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या अभिनया व्यतीरीक्त बेधडक वागण्यामुळे देखिल ओळखली जाते. तापसीचा बॉलिवूडमधील आत्तापर्यंतचा प्रवास काही सोप्पा नव्हता इथवर पोहोचण्यासाठी तिने अनेक खसता खाल्या आहेत. इतकेच नाही तर तापसीला शेवटच्या क्षणी सिनेमातून काढून टाकण्यात आले होते. नंतर सिनेमाच्या मेकर्सने या घटनेनंतर तापसीची रितसर माफि सुद्दा मागितली होती. तापसी पन्नूने नुकतच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान या सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे. रेडिओ जॉकि सिद्धार्थ कन्नन सोबत बोलताना तापसीने तिच्या सिनेसृष्टीतील कारकर्दीबाबत अनेक घटनांचा उलगडा केला आहे. तापसी म्हणाली की,” एके दिवशी तिला सिनेमातून काढले असल्याची माहिती माध्यमातर्फे मिळाली होती.तसेच नर्मात्यांनी माफि मागण्यासाठी अनेकदा मला संपर्क केला पण त्यांनी मला सिनेमातून नक्की का हटवण्यात आले आहे याचे कारण स्पष्टपणे दिले नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

- Advertisement -

2019 मध्ये आलेला सिनेमा ‘पति, पत्नी और वो’ मधून तापसीला रिप्लेस करण्यात आले असल्याची माहिती समोर आली होती. तसेच एका मुलाखती दरम्यान तापसीने म्हणाली होती की, मला सिनेमातून बदलण्यात आले आहे. पण मी माझ्या करियरमध्ये आत्मनिर्भर बनण्याचा निर्णय घेतला आहे. मी स्टार किड्समुळे दोन चित्रपट गमावले आहेत. ज्या सिनेमासाठी मला साईन करण्यात येणार होते पण त्यांनी मला अनप्रोफेशनल प्रकारे सिनेमातून काढले.

वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास तापसी सध्या कमालीची व्यस्त आहे. नुकतच तापसीचा ‘हसीन दिलरुबा’ सिनेमा रिलीज होणार आहे.तसेच ‘शाबास मितू’ या बायोपिकमध्ये तापसी झळकणार आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – कंगनाचा चित्रिकरणासाठी परदेशवारीचा मार्ग मोकळा


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -