Video : ‘बॉईज 2’ चा धमाल टिझर

Video : ‘बॉईज 2’ चा धमाल टिझर

सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे ती ‘बॉईज-2’ या मराठी चित्रपटाची. हा चित्रपट २०१७ मध्ये ‘बॉईज’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. विशाल देवरुखकर दिग्दर्शित बॉईज चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि ज्यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे अशा किशोरवयीन मुलांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. त्या पाठोपाठ आता चित्रपटाचा दुसरा पार्ट अर्थात ‘बॉईज २’ तरुणांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज झालं होतं. ज्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरविषयीची उत्सुकता अधिकच ताणली गेली होती. ट्रेलर रिलीज व्हायला अद्याप वेळ असला तरी नुकताच बॉईज २ चा ‘टिझर’  रिलीज झाला आहे. सध्या सोशल मीडियावर याच टिझरचा बोलबाला असून, प्रेक्षकांकडून आणि ‘बॉईज’च्या चाहत्यांकडून टिझरला भरपूर पसंती मिळते आहे. सध्या सोशल मीडियावरील ट्रेंडिंग व्हिडिओजमध्ये या व्हिडिओचाही समावेश आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत  ‘बॉईज २’ या चित्रपटाचं दिग्दर्शनही विशाल देवरुखकर यांनीच केले आहे. येत्या ५ ऑक्टोबरला हा चित्रपट तुमच्या भेटीला येणार आहे. पाहा, बॉईज २ चित्रपटाचा धमाल ट्रेलर :

सौजन्य- युट्यूब

कलाकार नवे की जुनेच?

तीन मित्रांचं रंजक पण तितकीच भावनिक जग मूळ बॉईज चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. त्यावेळी चित्रपटात सुमंत शिंदे, प्रतिक लाड, रितीका श्रोत्री, संतोश जुवेकर आणि पार्थ भालेराव आदी कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. दरम्यान बॉईज-२ च्या टिझरमध्ये काही नवीन चेहरे देखील आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे बॉईजच्या दुसऱ्या भागातील कलाकार नवीन असणार, जुने असणार की नव्या-जुन्या कलाकारांची टीम असणार? याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली असणार हे नक्की. दरम्यान, ‘बॉईज’ला मिळालेलं प्रेम पाहता ‘बॉईज २’ला देखील तितकंच प्रेम मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

‘बॉईज २’चं मोशन पोस्टर

हेही वाचा : ‘गाव गाता गजाली’ पुन्हा येणार!

First Published on: September 2, 2018 4:44 PM
Exit mobile version