ठरलं! ‘शकुंतला देवी’ चित्रपटही होणार डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

ठरलं! ‘शकुंतला देवी’ चित्रपटही होणार डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

विद्या बालन

अभिनेत्री विद्या बालन यांचा गणिततज्ज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक शकुंतला देवी हा चित्रपटदेखील आता डिजीटल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ इन यावर प्रदर्शित होणार असून त्याची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. तर विद्या बालन यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. साधारण वर्षभरापूर्वी विद्या बालन यांनी शकुंतला देवी चित्रपटात काम करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर चित्रपटाचे शूटींग सुरू झाले. हे शूटींग गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संपले. तर चित्रपट हा यंदाच्या उन्हाळ्यात प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस होता. मात्र कोरोना विषाणूच्या संकटामुळे लॉकडाऊन असल्याने सर्व कामकाज ठप्प असून चित्रपट प्रदर्शनही लांबणीवर केले आहे. त्यामुळे निर्मात्यांना आता तो ओटीटीवर प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे. अद्याप याच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झालेली नाही.

हेही वाचा – पालघर हत्याकांड : पीडितांची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा अपघातात मृत्यू

मानवी संगणक शकुंतला देवी 

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले आहे. तर विक्रम मल्होत्रा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. शकुंतला देवी यांना मानवी संगणक म्हणून ओळखले जाते. लहानपणापासून त्यांना गणित विषयाची आवड होती. त्या एक महान गणितज्ज्ञ होत्या. १९८२ मध्ये त्यांच्या नावाची ‘गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड’ मध्ये नोंद करण्यात आली. शकुंतला देवी यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ मध्ये बंगळुरूमध्ये एका ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांची भूमिका साकारण्यासाठी आपण उत्सुक असल्याची प्रतिक्रिया विद्या बालन यांनी दिली होती. नुकतेच आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले असून १२ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

First Published on: May 15, 2020 10:28 AM
Exit mobile version