घरताज्या घडामोडीपालघर हत्याकांड : पीडितांची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा अपघातात मृत्यू

पालघर हत्याकांड : पीडितांची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा अपघातात मृत्यू

Subscribe

पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणात पीडितांची बाजू मांडणाऱ्या भाईंदर येथील वकील दिग्विजय त्रिवेदी यांचा मेंढवणच्या खिंडीत अपघाती मृत्यू झाला आहे.

पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणात पीडितांची बाजू मांडणाऱ्या भाईंदर येथील वकील दिग्विजय त्रिवेदी यांचा मेंढवणच्या खिंडीत अपघाती मृत्यू झाला आहे. ते गुरुवारी डहाणू न्यायालयात जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सांधूच्या विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी येत असताना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. त्यांच्यासोबत प्रवास करणारी त्यांची सहकारी देखील गंभीर जखमी झाली आहे. कारवरील ताबा सुटून कार रस्त्याच्या कडेला उलटली आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणात पीडितांची बाजू मांडणाऱ्या भाईंदर येथील वकील दिग्विजय त्रिवेदी यांचा मेंढवणच्या खिंडीत अपघाती मृत्यू झाला आहे. ते गुरुवारी डहाणू न्यायालयात जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सांधूच्या विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी येत असताना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यांच्यासोबत प्रवास करणारी त्यांची सहकारी देखील गंभीर जखमी झाली आहे. कारवरील ताबा सुटून कार रस्त्याच्या कडेला उलटली आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, गडचिंचले हत्याकांड प्रकरणी आरोपींची संख्या आता १४१ झाली आहे. त्यातील ९ आरोपींच्या संख्येत आता एका अल्पवयीन आरोपीची भर पडली आहे. एकूण १० जण आता भिवंडी येथील बाल सुधारगृहात आहेत. तसेच खूनाच्या ६ नव्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १९ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

- Advertisement -

१०६ पैकी ५ जणांना पोलीस कोठडी

आधीच अटकेत असलेल्या १०६ जणांपैकी ५ जणांना न्यायालयाने १६ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तर उर्वरीत १०१ जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवले असले तरी त्यातील ४० जणांना तिसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांना १८ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याशिवाय १९ आरोपी आधीच पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहेत.

काय आहे पालघर हत्याकांड?

राज्यात लॉकडाऊनच्या दरम्यान, कांदिवली येथून गुजरातमधील दोन साधू आणि त्यांचा चालक सुरतला जाण्यासाठी निघाले होते. महाराष्ट्र आणि दादरा नगरहवेली केंद्रशासित प्रदेशाच्या हद्दीजवळ डहाणू तालुक्यातील गडचिंचले या गावी ते आले. दरम्यान, कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गडचिंचले गावाजवळ असलेल्या वन विभागाच्या चौकीजवळ ते रात्री ९.३० च्या सुमारास पोहोचले. त्यावेळी त्यांची गाडी तेथील ग्रामस्थांनी रोखली आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

या प्रकरणाबाबत कासा पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तिघांचीही जमावातून सुटका केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना आपल्या गाडीत बसवले. मात्र, ग्रामस्थानी पोलिसांवर दगडफेक करुन त्यांना पळून लावले आणि त्या गाडीवर हल्ला केला. दगडफेक, काठ्या आणि इतर साहित्य फेकण्यास सुरुवात केली. यामध्ये महाराज कल्पवृक्षगिरी (७०), सुशिलगिरी महाराज (३५), निलेश तेलगडे (३०) या तिघांची अमानुषपणे हत्या झाली.


हेही – वन नेशन, वन रेशन कार्ड योजना सर्व राज्यांमध्ये राबवणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -