मनुषी छिल्लर तिच्या ‘या’ फोटोमुळे चर्चेत

मनुषी छिल्लर तिच्या ‘या’ फोटोमुळे चर्चेत

मिस वर्ल्ड २०१७ मनुषी छिल्लर

मिस वर्ल्ड २०१७ चा किताब पटकवणारी सौंदर्यवती मनुषी छिल्लर नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले अपडेट्स तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारी ही युवती सातत्याने तिचे स्टायलिश आणि फॅशनेबल फोटो शेअर करते. नुकताच मनुषीने तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला असून त्यामुळे ती चर्चेत आली आहे. मिस वर्ल्ड मनुषी छिल्लर निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रो़डक्शनमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सिनेजगतात होत आहेत. मात्र त्यावर अद्याप कोणीही शिक्कामोर्तब केलेला नाही.

काय आहे ‘त्या’ पोस्टच गुपीत 

सध्या मनुषी तिच्या फोटोशूजमध्ये व्यग्र आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटो तब्बल ३ लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक केले आहे. या फोटोत मनुषी एका सोफ्यावर बसली असून तिने एकदम सेन्शुअस लुक दिला आहे. या फोटोला ओळ देत मनुषीने म्हटले आहे की, ‘The Miss World way of getting a tan.’

२०१७ साली पटकावला मिस वर्ल्डचा किताब

मनुषी छिल्लर हिने २०१७ साली मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता. तब्बल १७ वर्षांनंतर मनुषीने भारताला मिस वर्ल्ड जिंकण्याचा मान मिळवून दिला होता. हा किताब पटकवल्यापासून मनुषी देशातील विविध राज्यांमध्ये जाऊन महिलांना पीरियड्सच्या संदर्भात माहिती देत जनजागृतीचे काम करत आहे.

First Published on: September 14, 2018 12:12 PM
Exit mobile version