बायकोला आनंदी कसं ठेवू? कपिलचा बिग बिंना प्रश्न

बायकोला आनंदी कसं ठेवू? कपिलचा बिग बिंना प्रश्न

सौजन्य- सोनी टीव्ही

विनोदवीर कपिल शर्मा लवकरच त्याची गर्लफ्रेंड गिन्नीसोबत विवाबबंधनात अडकणार आहे. मात्र, लग्नाआधीच त्याने बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून एक खास सल्ला मागितला आहे. लग्न होण्यापूर्वीच ‘बायकोला आनंदी कसं ठेवू’ याबाबतचा सल्ला त्याने बिग बींकडे मागितला. कॉमेडी किंग कपिल शर्मा नुकताच ‘कौन बनेगा करोडपती’ या सोनी वाहिनीवरील रिअॅलिटी शोमध्ये गेला होता. या खास एपिसोडचं शूटिंग पूर्ण झालं असून, लवकरच सोनी चॅनेलवर हा एपिसोड टेलिकास्ट होणार आहे. दरम्यान, सोनीकडून या एपिसोडचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये कपिल अमिताभ बच्चन यांच्याकडून लग्नाविषयी सल्ला घेताना दिसतोय. प्रोमोमध्ये बिग बी कपिलला म्हणतायंत, की ‘तू लग्न करणार असल्याचं आम्हाला कळलंय’. यावर उत्तर देताना कपिल म्हणतोय की ‘आता तुम्ही प्रश्न विचारलाच आहेत, तर मला त्याबाबत सल्लाही द्या. लग्नानंतर बायकोला आनंदी ठेवण्यासाठी काय करावं लागेल, असा प्रश्न कपिलने बिग बिंना विचारलाय. यावर हसत हसत उत्तर देत बिग बी म्हणतायत की, ‘पत्नी काहीही बोलली तरी तू आधीच तिला सॉरी म्हणून टाक. यामुळे तुझे सगळेच प्रॉब्लेम्स दूर होतील.’ बिग बींनी कपिलला दिलेल्या या मजेशीर सल्ल्याची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. हा धमाल प्रोमोही सध्या इंटरनेटवर व्हायरल होतो आहे.


KBC च्या ‘फिनाले’मध्ये कपिलची धमाल

कपिल शर्मा आणि बिग बींची ही धमाल ज्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे, तो ‘कौन बनेगा करोडपती’च्या या सिझनचा फिनाले अर्थात अंतिम एपिसोड असणार आहे. या एपिसोडमध्ये कपिल आणि बिंगची चांगलीच केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे, ज्याची झलक तुम्हाला या प्रोमोमध्ये पाहायला मिळते आहे. प्रेक्षक हा एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक असणार हे नक्की.

कपिल शर्माचं लवकरच शुभमंगल

याचवर्षी १२ डिसेंबरला जालंधरमध्ये कपिल आणि गिन्नी लग्नबंधनात अडकणार असल्याचं कपिलनं जाहीर केलंय. इतकंच नाही तर या दोघांच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन दोन दिवसानंतर अर्थात १४ डिसेंबरला असून यामध्ये आपल्या सर्व मित्रांना आणि टीव्ही जगतातील सर्व कुटुंबाला आमंत्रण देणार असल्याचंही कपिलनं स्पष्ट केलं आहे.

 

First Published on: November 22, 2018 5:27 PM
Exit mobile version