निर्णय उत्तम आहे… विवेक अग्निहोत्रींनी केलं अर्थसंकल्पाचं कौतुक

निर्णय उत्तम आहे… विवेक अग्निहोत्रींनी केलं अर्थसंकल्पाचं कौतुक

देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प काल सादर झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासावर अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. तसेच या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने करदात्यांसाठी करपात्र रकमेत सूट देण्याची मोठी घोषणा केली. निर्मला सीतारमण यांनी 7 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहेत. आधी टॅक्स स्लॅब सहाचे होते ते आता पाचवर करण्यात आले आहेत. याच निर्णयावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट केलं आहे.

विवेक अग्निहोत्री नेहमीच सामाजिक, राजकीय विषयांवर आपलं मत मांडत असतात. बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केले. यामध्ये सांगण्यात आलेल्या टॅक्स स्लॅबमधील बदलावर विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलंय की, “स्लॅब 5 लाखावरुन 7 लाख करण्याचा निर्णय उत्तम आहे, व्वा..” असं म्हणत विवेक यांनी प्रतिक्रिया दिली असून नेटकरी त्यांच्या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

 


हेही वाचा :

शाहरुखच्या ‘पठाण’चा जगभरात डंका; 8 व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

First Published on: February 2, 2023 10:18 AM
Exit mobile version