पंतप्रधानांच्या लुकवरुन लोकांनी केले विवेकला ट्रोल

पंतप्रधानांच्या लुकवरुन लोकांनी केले विवेकला ट्रोल

विवेक ऑबेरॉय

पंतप्रधान नरेंदी मोदी यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नरेंद्र मोदींची भूमिकेत अभिनेता विवेक ओबेरॉय दिसणार असल्याचे सगळ्यांनाच माहिती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे. हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार होतो मात्र आता तो १२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. याच बायोपिकमधील मुख्य भूमिका साकारणाऱ्या विवेक ओबेरॉयचा लूक प्रेक्षकांना आवडला नसल्याची चर्चा सोशल मिडियावर चांगलीच रंगताना दिसत आहे. यावर अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रीया देऊन विवेकला ट्रोल केल्याचे  दिसते आहे.

नेटकऱ्यांकडून टीका

पंतप्रधान नरेंदी मोदी यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक मधील मोदींची मुख्य भूमिका साकारणाऱ्या विवेकचे ९ लूक सोमवारी ट्विटरवरून शेअर करण्यात आले. या सर्वच लूक्सना बघून कोणत्या अंगाने विवेक ओबेरॉय हा पंतप्रधान नरेंदी मोदी दिसतो! अशी सोशल मिडियावर अनेक नेटकऱ्यांनी अनेक टीकेची झोड उठवली आहे. ट्रेड अॅनाल‍िस्टने सोमवारी ट्व‍िटरवर हे ९ लूक जारी करण्यात आले. त्या लूक्सना बघून मोदी आणि विवेकमध्ये साम्य नसल्याने लोकांनी सांगत, विवेकच्या जागी परेश रावलने ही भूमिका साकारायला हवी असे देखील नेटकऱ्यांनी सांगितले.

अमित शहांच्या हस्ते पोस्टर लॉंच

या बायोपिकचे दिग्दर्शन ओमंग कुमार करत असून सुरेश ओबेरॉय आणि संदीप स‍िंह यांनी एकत्र येऊन निर्मिती केली आहे. या सिनेमाचे पोस्टर लवकरच भाजपाचे अध्यक्ष अमित शहांच्या हस्ते लॉंच केले जाणार आहे. या बायोपिकचे पोस्टर लॉंच १८ मार्च रोजी होणार होते. परंतु, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाल्याने हा पोस्टर लॉंच इव्हेंट रद्द करण्यात आला.

First Published on: March 18, 2019 1:21 PM
Exit mobile version