बायोपिकनंतर आता येणार मोदींची ‘वेब सिरीज’…

बायोपिकनंतर आता येणार मोदींची ‘वेब सिरीज’…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकपाठोपाठ आता मोदी यांच्या आयुष्यावर एक वेब सिरीजदेखील बनवण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित या वेबसिरीजचं नाव ‘मोदी’ असं असणार आहे. ही वेब सिरीज एकूण १० भागांची असल्याची माहिती समोर आली आहे. नुकताच या सिरीजचा फर्स्ट लूक समोर आला असून, येत्या एप्रिल महिन्यामध्ये ‘इरॉस नाऊ’वर ही वेब सिरीज प्रदर्शित होईल. गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान असा नरेंद्र मोदी यांचा प्रवास या वेबसीरीजमधून उलगडला जाणार आहे. दिग्दर्शक उमेश शुक्ला ‘मोदी’ वेब सिरीजचं दिग्दर्शन करणार आहेत. याआधी शुक्ला यांनी ‘ओह माय गॉड’ आणि ‘102 नॉट आऊट’चं दिग्दर्शन केलं आहे. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ‘मोदी’ सिरीजचा फर्स्ट लूक ट्वीटरवर शेअर केला आहे.

‘मोदी’ या आगामी वेब सिरीजमध्ये अभिनेता नरेंद्र  मोदींच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, यामध्ये काम करणाऱ्या अन्य कलाकारांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत. उपलब्ध माहितीनुसार, या वेब सीरीजचं सर्व शूटिंग गुजरात मध्ये पार पडलं आहे. या कलाकृतीद्वारे मोदींच्या स्वभावातील लोकांना माहित नसलेले पैलू उलगडण्याचा प्रयत्न केल्याचं, अभिनेता महेश ठाकूरने एका मुलाखतीत सांगितलं.

First Published on: March 14, 2019 12:48 PM
Exit mobile version